---Advertisement---

INDvsENG: संघनायकाची सुट्टी! टी२० बरोबर वनडे मालिकेतूनही जो रूट होणार बाहेर

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 3:08 PM
---Advertisement---

येत्या २४ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे. ही ४ सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर ५ टी -२० सामन्यांची मालिका आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. तत्पुर्वी इंग्लंडने भारताविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यात इंग्लंड संघासाठी पहिल्या कसोटी सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा कर्णधार जो रूट याचे नाव नव्हते. माहितीनुसार रूट टी-२० बरोबर एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर होऊ शकतो.

रूटला बसू शकतो रोटेशन पॉलिसीचा फटका

माहितीनुसार, जो रूटला भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते. रोटेशन पॉलीसीमुळे रूट सह ख्रिस वोक्सला देखील संघाबाहेर राहावे लागू शकते. आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धा आणि एशेस सीरिजमुळे खेळाडूंना विश्रांती मिळण्याकरिता इंग्लंड संघ रोटेशन पॉलिसीचा वापर करत आहे.

जो रूटची वनडे आणि टी२० कारकिर्द

रूट भलेही इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असला, तरी त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र पुरेपूर संधी मिळत नाही. मे २०१९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने अखेरचा टी२० सामना खेळला होता. तर सप्टेंबर २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला शेवटचा वनडे सामना खेळला होता. यादरम्यान त्याने १४८ वनडे सामना खेळताना ५९६२ धावा केल्या आहेत. तर टी२० क्रिकेटमध्ये फक्त ३२ सामन्यात ८९३ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

INDvsENG: भारतीय टी२० संघात नको होते ‘हे’ तीन चेहरे, दुसरा आहे जबरदस्त फॉर्ममध्ये

टॉप-४ : असे खेळाडू ज्यांनी टीम इंडियाला जिंकून दिले सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने

मोठ्या दिलाचा कर्णधार! लिलावात बोली लागता क्षणीच कोहलीने पाठवला शुभेच्छा संदेश; ज्युनियर अझरुद्दीनचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---