---Advertisement---

जो रूट इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, इंग्लंडसाठी करणार ‘हा’ खास रेकाॅर्ड

On: शनिवार, मे 31, 2025 9:31 PM
---Advertisement---

Joe Root: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम करू शकतो. मालिकेतील दुसरा सामना रविवार, (1 जून) रोजी कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. इंग्लंड सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिल्या वनडे सामन्यात त्यांनी पाहुण्या संघाचा 238 धावांनी पराभव केला होता. बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात रूटने 65 चेंडूत 57 धावांची खेळी केली, ज्यामुळे इंग्लंडने 50 षटकांत 8 गडी गमावून 400 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून वेस्ट इंडिजचा संघ फक्त 162 धावांवर ऑलआउट झाला.

जो रूट आधीच कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि जर त्याने रविवारी (1 जून) वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात आणखी 42 धावा केल्या तर तो इंग्लंडसाठी वनडे सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या हा रेकाॅर्ड इऑन मॉर्गनच्या नावावर आहे.

इऑन मॉर्गनने इंग्लंडसाठी 225 सामन्यांच्या 207 डावांमध्ये 39.75च्या सरासरीने 6,957 धावा केल्या आहेत. तर जो रूटने
178 सामन्यांच्या 167 डावांमध्ये 6,916 धावा केल्या आहेत. या काळात रूटची सरासरी 48.02 आहे. रूटने वनडे सामन्यांमध्ये 17 शतकांसह 42 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत इयान बेल तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने 161 सामन्यांच्या 157 डावांमध्ये 37.87च्या सरासरीने 5,416 धावा केल्या आहेत.

जर जो रूटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 84 धावा केल्या तर तो इंग्लंडसाठी 7,000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. याशिवाय, तो वनडे सामन्यात सर्वात जलद 7,000 धावा करण्याच्या बाबतीत सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि ब्रायन लारा सारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकेल. (Joe Root Records)

वनडे सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये 7,000 धावा करण्याचा रेकाॅर्ड हाशिम आमलाच्या नावावर आहे, ज्याने 150 डावांमध्ये हा आकडा गाठला. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केन विल्यमसन आहे, ज्याने 159 डावांमध्ये हा टप्पा गाठला. तर कोहलीने 161 डावांमध्ये हे केले आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिव्हिलियर्सने 166 डावांमध्ये हे केले आहे.

सौरव गांगुलीने 174 डावांमध्ये, रोहित शर्माने 181 डावांमध्ये आणि ब्रायन लाराने 183 डावांमध्ये हे केले आहे. जो रूटने आतापर्यंत 167 डावांमध्ये फलंदाजी केली आहे, जर त्याने उर्वरित 2 सामन्यांमध्ये 82 धावा केल्या तर तो गांगुली, रोहित आणि लारा सारख्या दिग्गजांना मागे टाकेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---