---Advertisement---

हे असं कुठं असतंय व्हय? चेंडू चमकवण्यासाठी रुटने लढवली अनोखी शक्कल, सहकाऱ्याच्या डोक्याचा केला वापर

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 1:37 PM
Joe Root uses colleagues head to shine the ball
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान या संघांमध्ये कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंचा कसोटी संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला जातोय. या सामन्यात इंग्लंड संघानेे प्रथम फलंदाजी करत 657 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचे प्रत्युत्तर देत पाकिस्तान संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 3 बाद 298 धावांवर खेळतोय. मात्र, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात एक विलक्षण गोष्ट बघायला मिळाली. इंग्लंडच्या गोलंदाजीच्या वेळी अशी एक घटना घडली जीने सगळ्यांना पोट धरुन हसायला भाग पाडले. ती गोष्ट म्हणजे इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने चेंडू चमकवण्यासाठी चक्क एका खेळाडूच्या डोक्यावर घासला.

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाची फलंदाजी सुरु होती. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) याने चेंडू चमकवण्यासाठी जॅक लीच (Jack Leach) या गोलंदाजाच्या डोक्यावर घासला. कोरोना काळानंतर चेंडू चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी घालण्यात आलेली. त्यामुळे खेळाडू आता घामाचा वापर करु लागले आहेत. अशातच जो रुटने जॅक लीच याच्या डोक्यावर आलेल्या घामाचा चेंडू चमकवण्यासाठी अत्यंत चतुराईने वापर केला.

इंग्लंडचा कसोटी संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तानात दौऱ्यावर आला. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी झंझावती शतके झळकावली. या शतकवीरांमध्ये झॅक क्राऊली (Zack Crawley), बेन डकेट (Ben Duckett), ओली पोप (Ollie Pope) आणि हॅरी ब्रूक (Harry Brook) यांचा समावेश आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 657 धावा केल्या.

या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ देखील चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन करत आहे. पाकिस्तानकडून अब्दुल्लाह शफीक (Abdullah Shafique) आणि इमाम उल हक (Imam ul Haq) यांनी शतके झळकावली. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान फलंदाजी करत असून लंचपर्यंत संघाच्या 3 गडी गमावत 298 धावा झाल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू
मोहम्मद शमीची रिप्लेसमेंट घोषीत, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पदार्पण करणाऱ्या गोलंदाजाला संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---