---Advertisement---

भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ‘त्या’ गोष्टींचा सर्वाधिक फायदा झाला, जो रुटचा खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 6:15 PM
---Advertisement---

नॉटिंघम येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला भारतासमोर २०९ धावांचे आव्हान ठेवण्यात यश आले आहे. तसेच इंग्लंडच्या विजयाच्या आशा त्याच्यामुळे जिवंत राहिल्या आहेत. दरम्यान, त्याच्या या कामगिरीबद्दल त्याने आपले मत व्यक्त केले आहे.

गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये अर्धशतक खेळण्यात अपयशी ठरलेल्या रूटने या सामन्याच्या पहिल्या डावात 64 धावा केल्या, त्यानंतर दुसऱ्या डावात 109 धावा केल्या. कसोटीत आता त्याच्या नावावर 21 शतक जमा झाले आहेत. त्याच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 300 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी झाला.

इंग्लंडचा दुसरा डाव 85.5 षटकांत 303 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 209 धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 183 धावांवर बाद झाला होता. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने एक विकेट गमावून 52 धावा केल्या होत्या. भारतीय संघ विजयापासून 157 धावा दूर आहे.

रूटने शनिवारी(7 ऑगस्ट) दिवसभरातील शतकी खेळानंतर एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले. “आम्हाला हा कसोटी सामना जिंकण्याची संधी आहे, आम्ही धावसंख्या करू शकलो याचा आनंद आहे,”.

जून-जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 68 आणि 79 धावांच्या नाबाद खेळींचा उल्लेख करताना रुट म्हणाला,”श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळल्याने मला खरोखरच फायदा झाला आहे.” या मालिकेपूर्वी आम्ही कसोटी सामने खेळले असते, तर बरे झाले असते, पण माझा विश्वास आहे की एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळल्याने माझी फलंदाजीची लय परत आली आहे.”

तो पुढे म्हणाला, ‘न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर मी माझ्या खेळाच्या तंत्रात काही बदल केले, मला वाटते की मी आता क्रीजचा चांगला वापर करत आहे.’  रूट या वर्षी कसोटीत 1000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरला आहे. यावर्षी भारताविरुद्ध चेन्नई कसोटीत 218 धावा करणाऱ्या रूटने 2021 मध्ये 1024 कसोटी धावांची नोंद केली आहे. रूट म्हणाला, ‘मला वाटते की 50 षटकांच्या प्रकारामध्ये खेळल्याने कसोटीत माझ्या फलंदाजीला खूप मदत होईल.’

इंग्लंडचे खेळाडू आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यात सामन्यादरम्यान थोडीशी चकमक झाली आणि जेव्हा रूटला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने तो एक गमतीदार प्रसंग असल्याचे म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या – 

आपल्या बॅगेत मिराबाई चानू ठेवते ‘ही’ गोष्ट; तर परदेशातही खाते गावाकडील भात, जाणून घ्या रंजक गोष्टी

टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ‘या’ राष्ट्रीय संघाने चक्क मुंबई संघाला दिले आमंत्रण

भारतातील असे ३ क्रिकेट स्टेडियम; जिथे १० वर्षांपासून झाला नाही एकही सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---