इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडकडून प्रथम फलंदाजी करताना जो रुटनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील 33वं शतक झळकावलं. यासह तो क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं ठोकणारा खेळाडू बनला आहे. याशिवाय त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याच्या बाबतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकलं.
जो रुटनं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील 33वं शतक झळकावलं. याशिवाय त्यानं एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 16 शतकं झळकावली आहेत. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या एकूण शतकांची संख्या 49 वर पोहोचली आहे. भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 48 शतकं ठोकली आहेत. रोहितनं एकदिवसीयमध्ये 31, कसोटीमध्ये 12 आणि टी20 मध्ये 5 शतकी खेळी केल्या आहेत. अशाप्रकारे त्याच्या एकूण शतकांची संख्या 48 आहे.
या शतकासह जो रुट कसोटीमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं ठोकणारा संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला. इंग्लंडसाठी रुटसह ॲलिस्टर कुकनं सर्वाधिक 33 कसोटी शतकं झळकावली आहेत. या दोघांशिवाय इंग्लंडचा कोणताही फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 30 किंवा त्याहून अधिक शतकं करू शकलेला नाही. तिसऱ्या क्रमांकावर केविन पीटरसन आहे, ज्याच्या नावे कसोटीमध्ये 23 शतकं आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, विराट कोहलीच्या नावे सर्वाधिक (80) शतकांचा विक्रम आहे. या यादीत विराटनंतर जो रुट (49) येतो आणि रोहित शर्मा (48) यांचा क्रमांक लागतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं (सक्रिय खेळाडू)
विराट कोहली – 80
जो रुट – 49
रोहित शर्मा – 48
केन विल्यमसन – 45
स्टीव्ह स्मिथ – 44
इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकं (सामने)
जो रुट – 33 (144)*
ॲलिस्टर कुक – 33 (161)
केविन पीटरसन – 23 (104)
हेही वाचा –
टी20 विश्वचषकादरम्यान रोहित आणि हार्दिकमधील वाद कसा संपला? खास व्यक्तीचा उलगडा
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सुरेश रैनाने टीम इंडियाला केले सतर्क, म्हणाला…
अर्रर्र! सूर्यादादा गोलंदाजीत ठरला फूस्स, स्वत:च्याच बॉलिंगवर वैतागला; पाहा व्हिडिओ