भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे चालू असलेला तिसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक स्थितीत आहे. पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूंच्या तिखट माऱ्यापुढे पाहुण्यांची त्रेधातिरपीट उडाली. तर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने पलटवार करत यजमानांना कोंडीत पकडले. त्यातही फलंदाजीत हातखंडा असलेल्या इंग्लंडच्या कर्णधार जो रूटने बळींचा पंचक घेत शानदार विक्रमांना गवसणी घातली.
भारतीय संघाने ३ बाद ९९ धावांपासून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला होता. सुरुवातीला फिरकीपटू जॅक लीचने अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माच्या रुपात भारताला २ दणके दिले. त्यानंतर रूटने फलंदाजीला येत रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांना तंबूचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, ६.२ षटकात फक्त ८ धावा देत त्याने ५ गडी केले.
यासह रूट सर्वात कमी धावात कसोटी क्रिकेटमध्ये बळींचा पंचक घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने टीम मे आणि मिचेल क्लार्क यांना पिछाडीवर सोडले आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टीम मे यांनी १९९२-९३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ९ धावा देत ही कामगिरी केली होती. तर मिचले क्लार्कने २००४-०५ मध्ये भारताविरुद्ध हा पराक्रम केला होता.
सर्वात कमी धावांत बळींचा पंचक घेणारे फिरकीपटू
८ धावा- जो रूट विरुद्ध भारत, अहमदाबाद २०२०-२१
९ धावा- टीम मे विरुद्ध वेस्ट इंडिज, ऍडलेड १९९२-९३
९ धावा- मिचेल क्लार्क विरुद्ध भारत, मुंबई २००४-०५
एवढेच नव्हे तर, कसोटीत बळींचा पंचक घेणारा रूट केवळ दुसराच कर्णधार ठरला आहे. याआधी तब्बल ३८ वर्षांपुर्वी पुर्वी बॉब विलिस यांना हा पराक्रम जमला होता. १९८३ मध्ये हेडिंग्ले येथे न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ही कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लीचची फिरकी अन् रोहितची गिरकी! फक्त ३ कसोटी सामन्यात चक्क ४ वेळा धाडलंय तंबूत
एकचं नंबर भावा! पृथ्वी शॉचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, विजय हजारे ट्रॉफीत शतकानंतर झुंजार द्विशतक