लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात यजमान इंग्लंडने ५ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान, इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार माजी कर्णधार जो रुट ठरला.
जो रुटचे जोरदार स्वागत
या सामन्यात (England vs New Zealand) न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी २७७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जो रुटने १७० चेंडूत नाबाद ११५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकार मारले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने ७८.५ षटकात ५ बाद २७९ धावा केल्या आणि सामना आपल्या नावे केला.
हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या सदस्यांकडून जो रुटचे (Joe Root) जोरदार कौतुक झाले. ड्रेसिंग रुममध्ये येत असताना लॉर्ड्सच्या लाँग रुममध्ये त्याचे तेथील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच इंग्लंड संघातील खेळाडूही ड्रेसिंग रुममधून खाली आले होते. नवनियुक्त कर्णधार बेन स्टोक्सने तर आनंदाने रुटला लाँग रुममध्ये घट्ट मिठीही मारली. त्यानंतर अन्य खेळाडूंनीही त्याला शुभेच्छा दिल्या.
रुटचे हे कसोटी कारकिर्दीतील २६ वे शतक ठरले. तसेच त्याने यादरम्यान कसोटीमध्ये १० हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. हा टप्पा पार करणारा तो इंग्लंडचा केवळ दुसराच, तर जगातील १४ वा खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने सर्वात कमी वयात १० हजार धावाही करण्याच्या ऍलिस्टर कूकच्या विक्रमाशी बरोबरीही केली. रुटने ३१ वर्षे १५७ दिवस वय असताना १० हजारावी धाव घेतली. कूकनेही ३१ वर्षे १५७ दिवस वय असताना १० हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
A hero's welcome for @Root66! 👏
🏴 #ENGvNZ 🇳🇿 pic.twitter.com/V7wa3aJt1a
— England Cricket (@englandcricket) June 5, 2022
इंग्लंडचा लॉर्ड्स कसोटीत विजय
लॉर्ड्स कसोटीत (Lord’s Test) न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडलाही पहिल्या डावात फार काही खास करता आले नाही. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद १४१ धावाच केल्या. दुसऱ्या डावात मात्र न्यूझीलंडने आपली फलंदाजी सुधारली. त्यांच्याकडून डॅरिएल मिशेलने शतकी खेळी करताना १०८ धावा केल्या. तसेच टॉम ब्लंडेलने ९६ धावांची खेळी केली.
त्यामुळे न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ९१.३ षटकात सर्वबाद २८५ धावा केल्या आणि इंग्लंडला २७७ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून माजी कर्णधार जो रूटने नाबाद ११५ धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडने ५ बाद २७९ धावा करत सामना आपल्या नावे केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी, सेहवाग, रैना सर्वच झाले निवृत्त, पण ‘त्या’ सामन्यात खेळलेला कार्तिक आजही टीम इंडियात
रहाणे आणि शर्माचे वय झालंय; ऑस्ट्रेलियच्या दिग्गज खेळाडूचे मोठे विधान
फ्रेंच ओपनच्या सेमिफायनलचा सामना थांबला काही काळासाठी, जाणून घ्या कारण