---Advertisement---

सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल जो रूट, माजी दिग्गजाची भविष्यवाणी

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 2:54 PM
---Advertisement---

इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी नुकतेच जो रूटची प्रशंसा करतांना मोठे विधान केले. बॉयकॉट यांनी जो रूट धावांच्या बाबतीत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यालाही मागे टाकेल, असे भाकीत वर्तविले आहे. तसेच रूट इंग्लंडसाठी २०० कसोटी सामने खेळेल, असेही मत बॉयकॉट यांनी मांडले आहे. आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी क्रिकेटमध्ये २०० सामने खेळण्याचा विक्रम फक्त सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

इंग्लंडच्या कसोटी संघाचा विद्यमान कर्णधार जो रूटने नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. त्याने २ कसोटीत १०६ च्या सरासरीने २ शतकांसह ४२६ धावा काढल्या. याच मालिकेत इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला.

त्याच्या याच कामगिरीने बॉयकॉट प्रभावित झालेले दिसले. आपल्या द टेलिग्राफ मधील स्तंभात लिहिले, “रूट इंग्लंडसाठी माझ्यापेक्षा, केव्हिन पीटरसनपेक्षा किंवा डेविड गॉवरपेक्षा जास्त धावा काढेल यात तर काहीच शंका नाही. त्याच्याकडे २०० कसोटी सामने खेळण्याची क्षमता आहे, आणि तो धावांच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकू शकतो. रूट आत्ता ३० वर्षाचा असून त्याने आत्ताच ९९ कसोटी सामन्यात ८२४९ धावा काढल्या आहेत. त्याला जर इथून पुढे फार मोठी दुखापत झाली नाही, तर सचिनचा १५,९२१ धावांचा विक्रम नक्कीच तोडू शकतो.”

“रूटची तुलना व्हावी कोहली, स्मिथ आणि विलियम्सनशी”

बॉयकॉट यांनी रूटची तुलना केवळ त्याच्या सध्याच्या सहकारी खेळाडूंसोबत व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “विराट कोहली, स्टीव स्मिथ आणि केन विलियम्सन दर्जेदार खेळाडू आहेत. ते देखील भरपूर धावा काढू शकतात. आपण रूटच्या फलंदाजीचा आनंद घ्यायला हवा आणि त्याची तुलना या दिग्गज खेळाडूंशीच करण्यात यावी. माजी खेळाडूंशी तुलना करण्यात अर्थ नाही, कारण त्या खेळाडूंच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, यात जमीन अस्मानाचा फरक आहे.”

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० निर्भेळ यश मिळवल्यानंतर आता इंग्लंडचा संघ भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. या दौऱ्यात चार सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंडसाठी ही मालिका महत्वाची आहे. त्यामुळे जो रूट आपला शानदार फॉर्म या मालिकेतही कायम राखेल, अशी इंग्लंडला अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या:

जो रूट म्हणाला चंडी लवकर बाद हो अन् तो खरंच, पाहा मजेशीर व्हिडिओ 

ये सब बातें प्राइवेट में होती तो! द्रविडचा मेल सार्वजनिक केल्याने भारतीय दिग्गजाने टोचले पीटरसनचे कान 

होय, पक्काच..! चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाच जिंकणार? असं आम्ही नाही हे आकडे सांगतायेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---