इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. आधीच संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. मुंबईने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यात त्यांनी फक्त 3 विजय मिळवले असून 4 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. चौथा धक्का मुंबईला स्पर्धेच्या 35व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 55 धावांनी बसला. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले की, जोफ्रा आर्चर संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी उपस्थित नाहीये. या सामन्याच्या काही तासानंतर एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने सांगितले की, आर्चर मध्येच संघाची साथ सोडून दुखापतींवर उपचार घेण्यासाठी बेल्जिअमला गेला होता. यानंतर आता वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने ट्वीट करत पत्रकाराला खडेबोल सुनावले आहेत.
वृत्तानुसार, दुखापतीने ग्रस्त असलेल्या जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या महिन्याच्या सुरुवातीला उपचारासाठी ब्लेजिअम (Belgium) येथे गेला होता. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्ससाठी सामने खेळता आले नव्हते. बेल्जिअममध्ये आर्चरने तज्ञांची भेट घेतली आणि तिथे त्याच्यावर सर्जरीही झाली. त्याने 2 एप्रिल रोजी बेंगलोरविरुद्ध हंगामातील पहिला सामना खेळला होता. त्यानंतर तो बेल्जिअमसाठी रवाना झाला होता.
आर्चरचे ट्वीट
यानंतर आर्चरने बुधवारी (दि. 26 एप्रिल) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून खळबळ माजवणारे ट्वीट केले. त्याने या ट्वीटमध्ये आपल्या संमतीशिवाय बातमी दिल्यामुळे पत्रकारावर राग व्यक्त केला आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “वस्तुस्थिती जाणून न घेता आणि माझ्या संमतीशिवाय लेख टाकणे म्हणजे वेडेपणा आहे. रिपोर्टर, तुला लाज वाटली पाहिजे. एखाद्या खेळाडूसाठी आधीच चिंताजनक आणि त्रासदायक वेळ आहे आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी असं करत आहात, ही समस्या तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे.”
Putting out an article without knowing the facts & without my consent is crazy.
Who ever the reporter is shame on you , an already worrying and troubling time for a player and you exploit it for your personal gain, it’s people like you that are the problem .
— Jofra Archer (@JofraArcher) April 26, 2023
तब्बल 8 कोटीत ताफ्यात सामील
आयपीएल 2023 या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण, स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच संघाचा महत्त्वाचा गोलंदाज संपूर्ण संघासाठी बाहेर झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चर याच्या दुखापतीवर लक्ष दिले, तर तोदेखील पूर्ण फिट असल्याचे दिसत नाहीये. मागील हंगामात मुंबईने आयपीएलच्या मेगा लिलावात आर्चरला 8 कोटी रुपयांमध्ये ताफ्यात सामील केले होते.
आयपीएल 2023मधील आर्चरच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने शेवटचा सामना 22 एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला होता. आता पुढील सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (jofra archer angry on reporter who gave news about him)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निम्मी आयपीएल संपली, Points Tableमध्ये धोनीच्या चेन्नईचा जलवा, ‘या’ 3 संघांसाठी प्ले-ऑफची वाट खडतर
‘या’ खेळाडूंना पहिलं बाहेर काढा, मुंबईच्या कामगिरीवर गावसकरांचे परखड मत; रोहितला ब्रेक घेण्याचा सल्ला