इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका 8 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी बुधवारी (16 ऑगस्ट) इंग्लंडचा 15 सदस्यीय संघ घोषित केला गेला आहे. बेन स्टक्स याने या आपली क्रिकेटधून घेतलेली निवृत्ती मागे घेत या संघात आपले नाव सामील केले आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर मात्र विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळवू शकला नाहीये.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) मागच्या वर्षी वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. कामाच्या तानामुळे त्याने हा निर्णय घेतला होता. मात्र, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) च्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्ती मागे घेत पुन्हा संघात आपले नाव सामील केले. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी हॅरी ब्रुक (Harry Brook) याला संघात स्थान मिळवता आले नाही. त्याच्या जागी स्टोक्सने संघात पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धचा हा वनडे संघ इंग्लंडचा विश्वचषकासाठी संभावित संघ मानला जात आहे. यात येत्या काही दिवसांमध्ये काही बदल होऊ शकतात.
जोफ्रा आर्चर याला या संघात संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली नाहीये. अशात आगामी वनडे विश्वचषकातून देखील त्याचे नाव वगळले जाण्याची शक्यता दाट आहे. मात्र, टेलिग्राफने दिलेल्या माहितीनुसार जोफ्रा आर्चर वनडे विश्वचषकासाठीच्या संघात नसला, तरी विश्वचषाच्या उत्तरार्धात संधी मिळू शकते. दुसरीकडे काही माध्यमांमध्ये असेही सांगितले गेले आहे की, आर्चरला विश्वचषकासाठी इंग्लंड संघात राखीव खेळाडू म्हणून संधी दिली जाऊ शकते. आर्चरने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2023 मध्ये खेळला होता. आयपीएल 2023मध्ये तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. पण संपूर्ण हंगामात त्याने पाचच सामने खेळले. (Jofra Archer could make his comeback in the 2nd half of the 2023 World Cup.)
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ (विश्वचषकासाठी संभावित संघ) –
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
महत्वाच्या बातम्या –
वनडे कपमधून पृथ्वी शॉ Ruled Out, जबरदस्त फॉर्ममध्ये असतानाच ओढावली नामुष्की
मोठी बातमी! बेन स्टोक्सने अखेर मागे घेतली वनडे निवृत्ती, न्यूझीलंडविरुद्ध करणार कमबॅक