दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (27 जानेवारी) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मॅनगाँग ओवर स्टेडियवर खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात इंग्लंड संघात एक असा बदल पाहायला मिळाल, ज्याची मागच्या मोठ्या काळापासून चाहत्यांना प्रतिक्षा होती. मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू न शकलेला इंग्लडंचा वेगवान गोलंदाज अखेर शुक्रवारी पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसला.
तब्बल दोन वर्षांनंतर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळू शकला नाहीये. शुक्रवारी त्याने इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्यये पुनरागमन केल्यानंतर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठीही ही बातमी आनंदाजी ठरली. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे दोन वर्ष क्रिकेट खेळू शकला नाही. त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचे सांगितले जात होते. तसेच आर्चरच्या हाताच्या कोपऱ्याला देखील गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आर्चरने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळला होता. तेव्हापासून मोठ्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळ संघ त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होता. अखेर आता ही प्रतिक्षा संपली आहे.
आर्चरने काही स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर करत तो 2023 साठी तयार असल्याचे सांगितले होते. अशात आता आर्चरचे आगमी वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धमाकेदार असण्याची पूर्ण शक्यता आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. संघाच्या या यशामध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज खेलाडूंनी योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई संघाने मागच्या आयपीएल हंगामात दुखापग्रस्त जोफ्रा आर्चरला देखील खरेदी केले. आर्चर मागच्या आयपीएल हंगामात केळणार नसला, तरी मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 8 कोटी रुपये खर्च करून त्याला ताफ्यात सामील केले. अशात आता हा संघाचा हा निर्णय आगामी आयपीएल हंगामात त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
मुंबईने आयपीएल 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सने आर्चरला रिटेन केले असून आघामी हंगामात तो संघाचा महत्वाचा खेळडू ठरू शकतो. जयप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर या दोन्ही गोलंदाजांनी आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली, तर मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात त्यांचा 6वे विजेतेपद पटकावू शकतो. आर्चरने आयपीएल इतिहासात आतापर्यंत 35 सामन्यांमध्ये 46 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर आर्चरने 13 कसोटी सामन्यांमध्ये 42 विकेट्स घेतल्या आहेत. वनडे मध्ये त्याने 17, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 सामने खेळले आहेत. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 30 आणि 14 विकेट्सची नोंद आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये नेणारी धडाकेबाज श्वेता! 146 च्या सरासरीने ठोकल्यात धावा
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच