Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तो पुन्हा आलाय! तब्बल 22 महिन्यांनंतर इंग्लंडच्या तुफानाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन

December 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/@ICC

Photo Courtesy: Twitter/@ICC


इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. तो सातत्याने दुखापतीचा सामना करत आहे. त्याने यादरम्यान गेल्या ३-४ महिन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दुखापतींनी प्रत्येकवेळी डोके वर काढल्याने त्याला पुन्हा मैदानाबाहेर जावे लागले. मात्र, आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले आहे.

जोफ्रा आर्चर हा 2020 च्या जानेवारी महिन्यात झालेल्या भारत दौऱ्यानंतर कोणत्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. फिश टॅंक साफ करताना झालेल्या दुखापतीमुळे त्याच्यावर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याने पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, तो यशस्वी ठरला नाही.‌ या संपूर्ण काळात तो दोन टी20 विश्वचषक व ऍशेस मालिकेला मुकलेला. मात्र, त्याच्या समावेशामुळे आता इंग्लंड संघाची ताकद आणखी वाढणार आहे. तसेच, अर्चना आगामी आयपीएल हंगामातही खेळताना दिसू शकतो.

आर्चर याला संघात स्थान मिळाले असले तरी, वनडे इतिहासात इंग्लंडसाठी दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढणारा जो रूट हा संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे रूट आता फक्त कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका 27 जानेवारीपासून खेळली जाईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड संघ- जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, फिल सॉल्ट, ऑली स्टोन, रीस टोप्ले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स.

(Jofra Archer Include In England ODI Sqaud For South Africa Series)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चलनी नोटांवर शोभणार जगज्जेता मेस्सी? अर्जेंटिना सरकार लवकरच घेऊ शकते निर्णय
“म्हणून मी कर्णधार म्हणून धोनीची शिफारस केली”, 15 वर्षानंतर सचिनने केला खुलासा 


Next Post
England-Cricket-Team

धक्कादायक! करोडो मिळण्याची शक्यता असतानाच इंग्लिश खेळाडूने घेतले आयपीएल लिलावातून नाव मागे

Najam Sethi

भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? पीसीबीच्या नव्या अध्यक्षांनी मांडली भूमिका

Photo Courtesy: Twitter/BCCI Domestic

रणजी ट्रॉफी: मुंबई-गुजरातचे दणदणीत विजय; लिलावाआधी युवा खेळाडूंनी दाखवली चमक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143