---Advertisement---

मुंबईचा ‘धनुर्धर’ झाला एकदम फिट, बुमराहच्या साथीने संघाला मिळवून देणार सहावी आयपीएल ट्रॉफी

On: रविवार, जानेवारी 1, 2023 6:57 PM
Jofra Archer
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा सोळावा हंगाम लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या स्पर्धेची क्रेझ भारताच्या घराघरात आहे. नव्या हंगामासाठी या स्पर्धेचा मिनी लिलाव कोचिन येथे पार पडला. यामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीशही झाले. असेच काही मागच्या हंगामात देखील झाले होते. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला मुंबई इंडियन्स या संघाने 8 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा मुंबईच्या चाहत्यांच्या अपेक्षा खूप उंचावल्या होत्या. चाहते जसप्रित बुमराह आणि जोफ्रा आर्चर या जोडीचा कहर पाहण्यासाठी उत्सुक होते. मात्र. ऐनवेळी जोफ्रा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

आयपीएल 2023 च्या या हंगामात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याने वर्षाच्या पहिल्या दिवशी त्याने ट्वीट करत म्हटले आहे की 2023 मी तयार आहे. याचबरोबर त्याने काही फोटो देखील शेअर केले, जे की त्याच्या दुखापतीच्या वेळी काढलेले आहेत, असे समजले जात आहे.

2019च्या विश्वचषकात जोफ्रा आर्चरने आपल्या गोलंदाजाने हाहाकार माजवला होता. या विश्वचषकात इंग्लंड संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आर्चर होता. मात्र, कोपर आणि पाठीच्या दुखापतीमुळे त्याला बरेच महिने क्रिकेटपासून लांब राहावे लागले. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च 2021 या दिवशी खेळला होता. आता तो पूर्णपणे ठणठणीत आहे आणि पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. नोव्हेंबरमध्ये त्याने अबू धाबी या ठिकाणी संघासोबत प्रशिक्षण घेतले.

मुंबई फ्रेंचायझीने त्याला दक्षिण आफ्रिका टी20 लीग साठी आपला संघ टीम केपटाऊनमध्ये सामील केले आहे. तो 1 जानेवारीपासून या संघात सामील होईल. त्यानंतर तो 27 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करणार आहे. या मालिकेलनंतर तो मुंबई इंडियन्स संघात जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) सोबत गोलंदाजी करताना दिसेल. ज्यासाठी चाहते मागच्या वर्षापासून उत्साहित आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता भारतासाठी पदार्पण करणे सोपे नाही! बीसीसीआयच्या आढावा बैठकीत घेतला गेला मोठा निर्णय
‘मिशन इंडिया’ फत्ते करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला माजी कर्णधाराचा आत्ताच गुरुमंत्र; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---