इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांमधील चार कसोटी सामन्यांची मालिका पार पडली आहे. आता येत्या १२ मार्चपासून हे दोन्ही संघ पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आमने-सामने येतील. मात्र या मालिकेपूर्वी इंग्लंडसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेत ३-१ अशा दारूण पराभव स्वीकाराव्या लागल्याच्या धक्क्यातून इंग्लंड संघ सावरत असतानाचा त्यांना हा धक्का बसला आहे. इंग्लंडचा संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज आगामी टी-२० मालिकेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुखापतीमुळे हा गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो.
इंग्लंडच्या चिंतेत वाढ
दुखापतीमुळे बाहेर होऊ शकणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आहे. आर्चर सध्या कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे. आर्चरला ही दुखापत सगळ्यात अगोदर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झाली होती. त्यानंतर सातत्याने त्याला या दुखापतीने पछाडले आहे. रिपोर्ट नुसार आर्चर पूर्णपणे या दुखापतीतून सावरला नसून तो भारताविरुद्धच्या संपूर्ण टी-२० मालिकेला मुकू शकतो.
याच दुखापतीमुळे आर्चर भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात देखील खेळू शकला नव्हता. सद्यस्थितीत त्याच्या दुखापतीवर इंग्लंडचे वैद्यकीय पथक लक्ष देत असून आर्चरला ऑपरेशनची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र टी-२० मालिकेत तो खेळणार काही नाही, याबाबत अंतिम निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी देखील वैद्यकीय पथक काय सल्ला देणार, यावर त्याच्या समावेशाबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
मात्र जर जोफ्रा आर्चर टी-२० मालिकेत खेळू शकला नाही, तर तो इंग्लंडच्या संघासाठी तो मोठा धक्का ठरेल. अर्थात नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत आर्चर आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. त्याची गोलंदाजी प्रभावहीन वाटली होती. मात्र त्याची यॉर्करवरील हुकुमत आणि गतीत परिवर्तन करण्याची कला मर्यादित षटकांच्या सामन्यात इंग्लंडसाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे आर्चरने या दुखापतीतून लवकर सावरावे, अशीच आशा इंग्लंडचे चाहते करत असतील.
महत्वाच्या बातम्या:
नादच खुळा! विजय हजारे ट्रॉफीत देवदत्त पड्डीकलचं सलग चौथं शतक; रनमशीनची केली बरोबरी
व्वा रे व्वा रिषभ! पाकिस्तानी दिग्गजालाही पाडली फलंदाजीची भुरळ; म्हणाले, पंत डाव्या हाताचा सेहवाग
टीम इंडियातील हा अष्टपैलू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ; रवी शास्त्रींनी केलं तोंडभरुन कौतुक