इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेट मैदानापासून दूर आहे. तो सातत्याने दुखापतीचा सामना करत आहे. त्याने यादरम्यान गेल्या ३-४ महिन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दुखापतींनी प्रत्येकवेळी डोके वर काढल्याने त्याला पुन्हा मैदानाबाहेर जावे लागले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने, तो आणखी किती काळ मैदानापासून दूर राहणार याबाबत अपडेट दिले आहे. (Update On Jofra Archer Injury)
कोपऱ्याच्या शस्त्रक्रियेमुळे आर्चर २०२१ मधील क्रिकेट हंगामातून दूर झाला होता. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त, आर्चर ऍशेस आणि आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये देखील खेळू शकला नव्हता. यावर्षी मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर आर्चर शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता. त्याने ५ टी२० मालिकांमध्ये भाग घेतलेला. मात्र, तो दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका खेळू शकला नव्हता. (Jofra Archer Injury)
काय आहे अपडेट
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आर्चर याच्या तंदुरुस्तीविषयी महत्त्वाचे अपडेट दिले. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले,
“आर्चर याच्या उजव्या कोपरावर ११ डिसेंबर रोजी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्या स्ट्रेस फॅक्चरमूळे तो सध्या सुरू असलेल्या हंगामात सहभागी होऊ शकणार नाही. तसेच पुढील उन्हाळ्यापर्यंत तो बरा होण्याची शक्यता कमी आहे.” आर्चर कारकीर्दीच्या सुरुवातीपासून दुखापतग्रस्त राहिला आहे.
आयपीएलमध्ये सहभागावर प्रश्नचिन्ह
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या ट्विटचा आधार घेतला तर हे निश्चित आहे की, आर्चर पुढील वर्षी आयपीएल खेळणे शक्य नाही. आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या रिटेंशनमध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने त्याला याच कारणाने संघात कायम केले नव्हते. तसेच आता तो मेगा लिलावात सहभागी होण्याचा देखील मार्ग जवळपास बंद झाला आहे. (IPL Mega Auction)
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवींच्या खराब फॉर्मवर ‘या’ ५ खेळाडूंची लय टाकणार पडदा! दक्षिण आफ्रिकेत घालणार धुमाकूळ