दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) भारतीय क्रिकेट संघाला गोलंदाजांकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताचा माजी दिग्गज गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) म्हणाला की, या दौऱ्यातही भारतीय संघाचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील. तो म्हणाला की, भारतीय संघाच्या गोलंदाजीत विविधता आहे आणि ते कोणत्याही खेळपट्टीवर २० बळी घेऊ शकतात.
एका वृत्तपत्राशी बोलताना झहीर म्हणाला, “या संघाचे गोलंदाज प्रत्येक सामन्यात २० बळी घेण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. जगभरातील हे सर्व गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करत असून, हे अतिशय संतुलित आक्रमण आहे. सर्वोत्तम भाग हा आहे. की या वेगवान गोलंदाजीत आमच्याकडे खूप वैविध्य आहे.”
“आपल्याकडे इशांतसारखा एक उंच गोलंदाज आहे जो काही प्रभावशाली आखूड टप्प्याचे चेंडू टाकू शकतो. मोहम्मद शमीमध्ये एक गोलंदाज आहे जो चेंडू दोन्ही बाजूने रिंग करण्यास पारंगत आहे. त्यानंतर आपल्याकडे जसप्रीत बुमराह हा खरोखरच जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. त्याचे वेगवान चेंडू टाकून चकमा देण्याच्या कौशल्याने अनेक फलंदाजांना अडचणीत आणले आहे.” (Zaheer Khan On Team India Bowling Sqaud In South Africa)
या गोष्टीची संघात कमतरता
झहीर पुढे म्हणाला, “आपल्याकडे बाकांवर शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज आहेत. एकंदरीत, आपला आक्रमणाचा ताफा विलक्षण आहे. त्यांना अपेक्षित यश मिळेल की नाही, याचा विचार करण्याची गरज नाही. केवळ हे का डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची कमतरता आहे. मात्र, मला असे वाटते की, आपण या गोष्टीबद्दल फार काही करू शकत नाही.”
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.
स्टँडबाय खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दिपक चहर, अर्झान नागवासवल्ला.
महत्त्वाच्या बातम्या-
कांगारू करणार इंग्लंडवर आणखी एक वार! ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाला मिळाली तिसऱ्या कसोटीसाठी संधी
अनुभवींच्या खराब फॉर्मवर ‘या’ ५ खेळाडूंची लय टाकणार पडदा! दक्षिण आफ्रिकेत घालणार धुमाकूळ