गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात लढत सुरु होती. सुरुवातीला ट्रम्प आघाडीवर होते. तर नंतर बायडन यांनी आघाडी घेतली. परंतु, अखेर बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष ट्रम्प यांना नमवत बाजी मारली आहे. मतमोजणी सुरू होऊन दोन दिवस उलटले तरी अमेरिकेचा अध्यक्ष कोण? हे स्पष्ट होत नव्हते. दोन्ही उमेदवारांनी विजयी असल्याचे दावे केले होते. मात्र, अखेर बायडेन यांची या लढाईत विजयी झाले आहेत.
पण बायडेन यांच्या निवडीनंतर इंग्लंड आणि आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर चर्चेत आला आहे. ६ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ साली आर्चरने केलेल्या ट्विटसंदर्भात ही चर्चा रंगली आहे.
झाले असे की, आर्चरने ४ ऑक्टोबर २०१४ रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले होते. यामध्ये त्याने फक्त ‘जो’ असे लिहून पुढे उद्गारवाचक चिन्ह दिले होते. अर्थातच त्याने जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. अशात ६ वर्षांपूर्वीचा त्याचा हा अंदाज आता खरा ठरल्यामुळे चाहत्यांनी आर्चरच्या ट्विटला प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
https://twitter.com/JofraArcher/status/518244164929351680?s=20
आर्चरच्या या ट्विटवर काही चाहत्यांनी कमेंट करत नक्की तुला काय म्हणायचे आहे? असा प्रश्न केला. एका वापरकर्त्याने तर त्याला ‘तू याचीही भविष्यवाणी केलीस का? तू नक्की जोफ्रा आर्चर आहेस का भविष्य सांगणारा व्यक्ती?,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता.! एका गुलीगत विकेटसाठी ‘त्याने’ आयपीएलमध्ये घेतलेत तब्बल ७५ लाख
विराट कोहलीची ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार? कारण आहे खूप खास
IPL Qualifier 2: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉला डच्चू? ही नवी जोडी दिसू शकते सलामीला
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार






