Jofra Archer Catch: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. आर्चर संघात आल्यापासून इंग्लंडच्या गोलंदाजी युनिटला वेगळीच धार आली आहे. मात्र, आर्चरने या सामन्यात गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही शानदार प्रदर्शन केले आहे. सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने लॉर्ड्स कसोटीत एक शानदार झेल पकडला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Jofra Archer catch video)
खरं तर, आर्चरने भारताच्या दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरला बाद करण्यासाठी आपल्याच चेंडूवर एक लाजवाब झेल पकडला. हे सर्व काही भारताच्या दुसऱ्या डावाच्या 25व्या षटकात घडले. या षटकात आर्चर स्वतः गोलंदाजी करत होता. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने सुंदरला बाद केले. आर्चरने राउंड द विकेटमधून ऑफ स्टंपच्या रेषेवर हा चेंडू टाकला होता. पिचवर पडल्यानंतर चेंडू अँगलने फलंदाजाच्या आत आला. सुंदरने स्वतःला वाचवण्यासाठी एक शॉट खेळला आणि चेंडू बॅटला लागून आर्चरच्या उजव्या बाजूला गेला. इथेच आर्चरने कमालीची चपळता दाखवली आणि आपल्या उजव्या बाजूला डाईव्ह मारत एका हाताने अत्यंत अप्रतिम झेल पकडला. (Jofra Archer one-handed catch)
You cannot do that Jofra Archer!
— England Cricket (@englandcricket) July 14, 2025
Out of this world ???? pic.twitter.com/mGNpgKPphl
सुंदरने या सामन्यात दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली होती. तिथे त्याने जो रूट आणि बेन स्टोक्ससह 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. याच सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्सही पूर्ण केल्या. पण, धावसंख्या पाठलाग करताना तो बॅटने काही खास कमाल करू शकला नाही. भारतासाठी दुसऱ्या डावात सुंदर 4 चेंडूत खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. तर, पहिल्या डावात त्याने बॅटने 23 धावांचे योगदान दिले होते. आता सुंदरला पुढील कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळेल की नाही हे पाहणे खूपच रंजक ठरेल. (Washington Sundar wicket)






