---Advertisement---

‘…म्हणून मॉर्गन सर्वोत्कृष्ट कर्णधार’, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने स्पष्ट केले कारण

Eion-Morgan-Jofra-Archer
---Advertisement---

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार ओएन मॉर्गनच्या निवृत्तीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. ही अशी गोष्ट होती ज्याची त्यांना अपेक्षा नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. जोफ्रा आर्चरने इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडकडून पदार्पण केले. तो म्हणाला की मॉर्गनला त्याच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे. यासोबतच त्याने २०१९ विश्वचषकाशी संबंधित एक प्रसंगही सांगितला.

जोफ्रा आर्चरने २०१९ विश्वचषक फायनलचा उल्लेख केला
डेली मेलशी संवाद साधताना जोफ्रा आर्चर म्हणाला की, “मॉर्गन निवृत्त होईल अशी त्यांची अपेक्षा नव्हती.  मला २०१९ च्या विश्वचषक फायनलमधील एक प्रसंग आठवतो जेव्हा मी लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हर करत होतो. किवी संघाला विजयासाठी दोन चेंडूत तीन धावांची गरज होती. मॉर्गन माझ्याकडे आला आणि म्हणाला हा जुगार आहे आणि मी विकेट घेण्याचा किंवा डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करेन. मी म्हणालो की मला बाउन्सर टाकायचा आहे. तो म्हणाला तुला मला खात्री आहे का?, तर मी म्हणालो हो, यासाठी क्षेत्ररक्षण लाव. मॉर्गनने मला गोलंदाजी करू द्यावी अशी मला अपेक्षा नव्हती कारण त्यावेळी ते खूप धोकादायक होते. पण त्याने माझ्या मनाप्रमाणे मला गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.”

दरम्यान, ओएन मॉर्गनने १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतली आहे. ३५ वर्षीय मॉर्गन एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा करणारा तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘आता जॉस इंग्लंडला बनवणार क्रिकेट जगतातला बॉस!’ इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून नव्या कर्णधाराची घोषणा

पंत विराट अन् बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी२०ला मारणार दांडी, वाचा कोणकोणत्या खेळाडूंना मिळणार संधी

VIDEO। ‘लॉर्ड’पेक्षा ‘हे’ टोपणनाव शार्दूलला जास्त आवडतं, खुद्द शार्दूलनेच सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---