भारतीय क्रिकेट संघाचा माजी वोगवान गोलंदाज जोगिंदर शर्माने माजी कर्णधार एमएस धोनीची भेट घेतली आहे. जोगिंदर शर्मा हा तोच वेगवान गोलंदाज आहे तो 2007 च्या ची20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध शेवटचा षटक टाकला होता केवळ 13 धावा बचाव केला होता. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे टीम इंडियाला विश्वविजेता होण्यासाठी मोठी मदत झाली होती. आता तब्बल 12 वर्षांनी टी20 विश्वचषक 2007 शेवटच्या सामन्यातील हिरोने एम एस धोनीची भेट घेतली आहे.
2007 च्या ची20 विश्वचषकाच्या स्पर्धेत एम एस धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. ज्याने पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माकडून शेवटचे षटक पार पाडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला होता. जोंगिदर शर्मा सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी आहेत.
जोगिंदर शर्माने एमएस धोनीसोबतच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर त्यांनी ‘आये यार सुन यारी तेरी…’ हे गाणे वापरले आहे. याशिवाय फोटोंना कॅप्शन देताना, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि हरियाणा पोलिसांचे सध्याचे डीएसपी, जोगिंदर शर्मा यांनी लिहिले की, “एमएस धोनीला खूप दिवसांनी भेटून आनंद झाला. आज 12 वर्षांनंतर तुम्हाला भेटून वेगळाच आनंद झाला. ”
View this post on Instagram
भारतीय संघाला 2007 च्या टी20 विश्वचषकामध्ये अंतिम सामन्यात हिरो ठरणारा जोगिंदर शर्माचा आंतरराष्ट्रीय करिअर खूपच कमी राहिला. त्याने टीम इंडियासाठी 2004 ते 2007 पर्यंत क्रिकेट खेळला आहे. या दरम्यान माजी गोलंदाजाने 4 एकदिवसीय तर 4 टी20 सामने खेळला आहे. त्याने 4 एकदिवसीय सामन्यात 1 विकेट घेतला असून फलंदाजी करताना 25 धावा केल्या आहेत. या शिवाय 4 टी20 सामन्यात जोंगिदर शर्मा ने 4 विकेट मिळवल्या आहेत.
हेही वाचा-
भारतासाठी हार्ट ब्रेक…मनू भाकरचं तिसरं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं
‘मी म्हातारा झालोय… कोणीही मला परवडणार नाही..,’ वीरेंद्र सेहवाग असं का म्हणाला?
टीम इंडिया नाही तर या संघाकडून मोहम्मद शमी करणार कमबॅक, भारताकडून खेळण्याबाबत दिले मोठे अपडेट