इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना मैदानावर लॉर्ड्स मैदानावर खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत केवळ तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडचा धुव्वा उडवत एक डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या पदरी लाजिरवाणा पराभव पडला असला तरी, संघाचा अनुभवी फलंदाज जॉनी बेअरस्टोने या कसोटीच्या दुसऱ्या डावात चालू वर्षातील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
लॉर्ड्स मैदानावर झालेल्या या सामन्यात तीनही दिवशी पाहुण्या संघाचे वर्चस्व राहिले. इंग्लंडचे फलंदाज दोन्ही डावात पुरते अपयशी ठरले. सर्वाधिक अपेक्षा असलेले कर्णधार बेन स्टोक्स, जो रूट व जॉनी बेअरस्टो यांना दोन्ही डावात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी रोखले.
मागील पाच कसोटी सामन्यांपासून कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या जॉनी बेअरस्टोला दक्षिण आफ्रिकेच्या एन्रिक नॉर्किएने दोन्ही डावात तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या सामन्यात त्याने बेअरस्टोला खातेही खोलू दिले नव्हते. तर दुसऱ्या डावात १८ धावांवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
बेअरस्टोने या सामन्यात केवळ १८ धावा केल्या असल्या तरी त्याच्या नावे एक मोठी कामगिरी जमा झाली. २०२२ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याच्या नावे आता चालू वर्षातील ९ कसोटींच्या १८ डावात १०१२ धावा जमा झाल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ६७.४६ अशी कमालीची राहिली आहे. त्याच्या नावे यावर्षी सर्वाधिक ६ कसोटी शतके देखील आहेत. इंग्लंडचा जो रूट ९४१ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. बेअरस्टोने आपल्या कसोटी कारकिर्दीत दुसऱ्यांदा एका वर्षात १००० धावांचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाण अन् केकेआरच्या सीईओंमध्ये मजेशीर वॉर! ट्वीट द्वारे एकमेकांची घेतली मजा
आता थेट ८८ वर्षाच्या दिग्गजाने विराटला दिला फॉर्ममध्ये येण्यासाठी सल्ला
केरळचा इंजिनीयर बनला युएईचा कॅप्टन! आता भारताशीच करणार दोन हात