ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) मेलबर्न पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याने ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास याला पराभूत करत विजेतेपद पटकावले. 6-3, 7-4, 7-6 अशा सरळ सेटमध्ये जोकोविचने त्सित्सिपास याला पराभूत केले. विशेष म्हणजे, दोघेही आमने-सामने येण्याची ही तेरावी वेळ होती. यासोबतच जोकोविचने जबरदस्त विक्रमही रचला.
जोकोविचची ऑस्ट्रेलियन ओपनमधील कामगिरी
सर्बियाच्या 35 वर्षीय नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत विक्रम रचला. तो ही स्पर्धा सर्वाधिक 10 वेळा जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला. त्यापूर्वी त्याने ही स्पर्धा 9 वेळा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन ओपन सर्वाधिक वेळा जिंकण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. 2008 साली वयाच्या 19व्या वर्षी तो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकला होता. ते त्याचे करियरमधले पहिलेच ग्रँडस्लॅम होते. 2005पासून जोकोविचने 18वेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला असून तब्बल 10 वेळा फायनल गाठली आहे. यात 3वेळा तो उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर गेला.
The Melbourne throne belongs to @DjokerNole 🤴 pic.twitter.com/oGODOPmw6p
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
🏆 🏆 🏆 🏆 🏆 CHAMPION 🏆 🏆 🏆 🏆 🏆@DjokerNole has mastered Melbourne for a TENTH time!@wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • #AusOpen • #AO2023 pic.twitter.com/ZThnTrIXdt
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
जोकोविचचा असाही विक्रम
जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत जाणारा आतापर्यंत चौथा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आजपर्यंत जोकोविच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कधीही पराभूत झालेला नाही. जोकोविचने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपन 10, फ्रेंच ओपन 2, विंब्लडन 7 तर अमेरिकन ओपन 3 अशी एकूण 22 विजेतेपद जिंकली आहेत. 2019पासून जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनचा एकही सामना गमावला नाही. त्याने 2022मध्ये स्पर्धेत भाग घेतला नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सलग 27 सामने जिंकण्याचा पराक्रम त्याने केला आहे.
KING OF MELBOURNE 👑 @DjokerNole pic.twitter.com/myM619PTVN
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2023
नदालच्या विक्रमाची बरोबरी
‘जोकर’ (Joker) नावाने प्रसिद्ध असलेल्या जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन 2023 (Australian Open 2023) स्पर्धा जिंकत स्पेनच्या राफेल नदाल (Rafael Nadal) याच्या विक्रमाची बरोबरी केली. नदालने पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. नदालने 22वेळा पुरुष एकेरीत ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले आहे, तर सध्या जोकोविचच्या नावावर 21 विजेतेपदं आहेत. नदाल या स्पर्धेत दुसऱ्या फेरीतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळे नदालच्या विक्रमाची बरोबरी करण्याची मोठी संधी जोकोविचने करून दाखवली.
सर्वाधिक वेळा गाठली ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी
जोकोविचने तब्बल 33वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. ग्रॅंडस्लॅम स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, विंब्लडन, फ्रेंच ओपन अर्थात रोला गॅरोस व अमेरिकन ओपनचा समावेश होतो. या चारही स्पर्धांंना मोठे ऐतिहासीक महत्त्व आहे. जोकोविच पाठोपाठ स्विझर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने 31 वेळा तर राफेल नदालने ३०वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली आहे. फेडररने गेल्यावर्षी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे आता सर्वाधिक विजेतेपदाच्या गेममध्ये नदाल व जोकोविच ही नावंच राहिली आहेत. (Joker Novak Djokovic Beats Tsitsipas in Australian Open to equal Nadal’s record)
पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणारे खेळाडू
22 वेळा- नोवाक जोकोविच (सर्बिया)*
22 वेळा- राफेल नदाल (स्पेन)
20 वेळा- रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड)
14 वेळा- पीट सॅम्प्रास (अमेरिका)
12 वेळा- रॉय इमर्सन (ऑस्ट्रेलिया)
11 वेळा- रॉड लेवर (ऑस्ट्रेलिया)
11 वेळा- ब्योर्न बोर्ग (स्वीडन)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: ऑस्ट्रेलियन ओपनला मिळाली नवी राणी! बेलारूसच्या अरिना सबालेंकाने रचला इतिहास
Australian Open 2023: टॉमीला नमवत जोकोविचला मिळाले फायनलचे तिकीट, अंतिम सामन्यात स्तिस्तिपासला भिडणार