इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शुक्रवारी (9 सप्टेंबर) टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला. मात्र संघ जाहीर झाल्यानंतर 5 तासांनंतर संघाला मोठा धक्का बसला. संमघातील आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला फलंदाज जॉनी बेअरस्टो जखमी झाल्यामुळे संघातून ब्हेर गेला असल्याचे वृत्त आता समोर आलेे आहे. त्.ामुळे आधी जेसन रॉयची अनुपस्थिती नंतर जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त आणि आता जॉनी बेअरस्टोची अनुपस्थिती यामुळे इंग्लंजला एकापाठोपाठ एक ३ झटके बसल्याचे दिसून येत आहे.
जॉनी बेअरस्टो यापुढे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. टी-२० विश्वचषकासाठी त्याच्या जागी अजून एका खेळाडूच्या नावाची घोषणा झालेली नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. सध्याच्या मोसमात बेअरस्टो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत त्याची एक्झिट इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे.
3 शतके केली आहेत
32 वर्षीय जॉनी बेअरस्टोने आतापर्यंत एकूण टी20 मध्ये 3 शतके झळकावली आहेत. त्याने 167 डावात 31 च्या सरासरीने 4304 धावा केल्या आहेत. 25 अर्धशतकेही झळकावली आहेत. स्ट्राइक रेट 138 आहे. त्याने इंग्लंडकडून 66 टी-20 सामन्यांमध्ये 1337 धावा केल्या आहेत. 8 अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट 136 आहे. १९ धावांची सर्वोत्तम खेळी.
बेअरस्टोने नुकत्याच झालेल्या भारताविरुद्धच्या ५व्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावल्याची माहिती आहे. यामुळे इंग्लिश संघ विक्रमी लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला आणि कसोटीही जिंकली. त्यामुळे मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली. संघाला पाकिस्तानमध्ये 7 टी-20 सामनेही खेळायचे आहेत.
विश्वचषकासाठी इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अल्टिमेट खो खो स्पर्धेत प्रतीक वाईकरच्या कामगिरीमुळे तेलगु योद्धाज संघाची आगेकूच
ऑस्ट्रेलियाला एकाच खेळाडूत मिळाला हार्दिक आणि पोलार्ड! मुंबई इंडियन्ससोबत खास कनेक्शन
पाकिस्तानी दिग्गज झालाय सूर्याच्या खेळाचा चाहता! स्वत: केले त्याच्या खेळीचे कौतुक






