---Advertisement---

INDvENG। पाचव्या कसोटीनंतर जॉनी बेअरस्टोला स्पेशल गिफ्ट! आयसीसीने दिलाय विशेष सन्मान

Jonny-Bairstow
---Advertisement---

भारताविरुद्ध एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावांत शतके झळकावणारा इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो याला जून महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित करण्यात आले आहे. बेअरस्टोसोबतच सहकारी फलंदाज जो रूट आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिशेलही हा सन्मान मिळविण्याच्या शर्यतीत होते. पण, बेअरस्टो या दोघांनाही मागे टाकत त्याची जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली.

भारताविरुद्ध एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावांत शतक झळकावण्यापूर्वी बेअरस्टोने न्यूझीलंडविरुद्ध सलग दोन कसोटीत शतके झळकावली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात संथ सुरुवात करूनही बेअरस्टोने नॉटिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी सामना जिंकणाऱ्या १३६ धावा केल्या. त्याच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ५० षटकांत २९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंडवर विजय मिळवला.

बेअरस्टोने नॉटिंगहॅम येथे १३६ धावांच्या खेळीत इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतकही झळकावले. यानंतर लीड्स येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीतही त्याने १६२ धावांची आणि नाबाद ७१ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा क्लीन स्वीप केला होता. त्याने एजबॅस्टन येथे भारताविरुद्धच्या पुनर्निर्धारित कसोटीतही आपला फॉर्म कायम राखला आणि दोन्ही डावात शतके झळकावून भारताचे १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही.

https://twitter.com/ICC/status/1546404948942127104

निवड केल्याबद्दल चाहत्यांचे आभार
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाल्याबद्दल बेअरस्टो म्हणाला, “मला आयसीसी पुरुष खेळाडू म्हणून मतदान केल्याबद्दल मी चाहत्यांचे आभार मानू इच्छितो. इंग्लंडसाठी गेले ५ आठवडे अविश्वसनीय ठरले. न्यूझीलंड आणि भारतासारख्या बलाढ्य कसोटी संघांविरुद्ध ४ कसोटी जिंकून या उन्हाळ्याची चांगली सुरुवात होऊ शकली नसती. आम्ही एक संघ म्हणून आमच्या क्रिकेटचा आनंद घेत आहोत आणि स्पष्टता आणि सकारात्मकतेने खेळत आहोत. या कालावधीत मी चार शतके झळकावली असली तरी, मला माझ्या संघसहकाऱ्यांचे कौतुक करायचे आहे ज्यांनी खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आणि पूर्ण आत्मविश्वासाने खेळ केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

श्रीलंकेला लागला झाला मोठा झटका, जबरदस्त फॉर्मात असलेला खेळाडू मालिकेबाहेर

आरं तुझं चाललंय तरी काय? धावा काढणे तर सोडाच, विराट आता हातातला कॅचही सोडतोय

दिनेश चंडिमलचा द्विशतकी धमाका! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच श्रीलंकन क्रिकेटरला न जमलेला विक्रम नावावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---