---Advertisement---

दिनेश चंडिमलचा द्विशतकी धमाका! ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याच श्रीलंकन क्रिकेटरला न जमलेला विक्रम नावावर

On: सोमवार, जुलै 11, 2022 2:24 PM
Dinesh-Chandimal
---Advertisement---

गॉल येथे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात दिनेश चंडीमलने द्विशतकी धमाका केला. त्याने ३२६ चेंडूत नाबाद २०६ धावांची खेळी करताना १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. याबरोबरच तो कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक करणारा पहिलाच श्रीलंकेचा फलंदाज ठरला आहे.

त्याच्या द्विशतकामुळे श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर १९० धावांची मोठी आघाडी पहिल्या डावात मिळवली. श्रीलंकेने पहिल्या डावात १८१ षटकात सर्वबाद ५५४ धावा केल्या. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने मार्नस लॅब्युशेन (१०४) आणि स्टीव्ह स्मिथ (१४५) यांच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

(ही बातमी ८० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---