आतापर्यंत क्रिकेटविश्वात अनेक महान खेळाडू होऊन गेले आणि आताही आहेत. त्यातून सार्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडणे म्हणजे खूपच कठीण काम. अनेकदा आजी किंवा माजी क्रिकेटपटू हे आपला सार्वकालीन ११ खेळाडूंचा संघ निवडत असतात. असाच संघ इंग्लंड संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो याने निवडला आहे.
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोने त्याच्या सार्वकालीन ११ खेळाडूंची निवड केली आहे. सध्या इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघातील महत्त्वाचा भाग असणारा जॉनी बेयरस्टोने आपल्या ११ खेळाडूंच्या संघात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर सर्वाधिक अवलंबून आहे. जॉनी बेयरस्टोच्या सार्वकालीन प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ दक्षिण आफ्रिकन खेळाडू घेतले आहेत.
जॉनी बेयरस्टोने भारतीय संघाच्या खेळाडूंवर कमी विश्वास व्यक्त केला आहे. त्याच्या संघात केवळ १ भारतीय खेळाडूची निवड केली आहे. ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडूलकर हा एकमेव भारतीय खेळाडू आहे, जो जॉनी बेयरस्टोच्या सार्वकालीन ११ खेळाडूंमध्ये आहे. त्याचवेळी कोणताही भारतीय गोलंदाज जॉनी बेअरस्टोच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
याखेरीज सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने अॅडम गिलक्रिस्ट, कुमार संगकारा आणि एमएस धोनी यांची निवड करण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. बेयरस्टोने एलिस्टर कुकला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. जॉनी बेयरस्टोने त्याच्या संघात ३ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकीपटूचा समावेश केला आहे.
असा आहे जॉनी बेयरस्टोचा सार्वकालीन ११ खेळाडूंचा संघ : एलिस्टर कुक, हाशिम आमला, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, ज्यो रूट, अब्राहम डिव्हिलियर्स, (यष्टीरक्षक), मिशेल जॉन्सन, डेल स्टेन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन.
महत्वाच्या बातम्या
भावा, कुठे स्विमिंग पुलमध्ये होणार का सामना? ‘ते’ ट्वीट करत भज्जी नेटिझन्सकडून झाला ट्रोल
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन