रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आयपीएल २०२२चा ६०वा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबच्या खेळाडूंनी फलंदाजी विभागात जबरदस्त प्रदर्शन केले. त्यांच्या २ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्या. यामध्ये सलामीवीर जॉनी बेयरस्टो याचाही समावेश आहे. बेयरस्टोने बेंगलोरविरुद्ध खोऱ्याने काढत आपले आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक नोंदवले आहे.
बेयरस्टोने (Jonny Bairstow) सलामीला फलंदाजीला येत अवघ्या २१ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक (Jonny Bairstow Fastest Half Century) पूर्ण केले. पुढे आणखी ८ चेंडू खेळताना त्याने ९ धावा जोडल्या आणि ६६ धावांचे योगदान देत शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आपल्या या झंझावाती खेळीदरम्यान त्याने ७ षटकार आणि ४ चौकारही मारले.
हे बेयरस्टोचे आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. तसेच बेंगलोर संघाविरुद्धचे हे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये बेंगलोरविरुद्ध २८ चेंडू खेळताना अर्धशतक केले होते. बेंगलोरविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघांविरुद्ध बेयरस्टोची बॅट तळपली आहे.
जॉनी बेअरस्टोचे आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक
२१ चेंडू विरुद्ध आरसीबी, आज
२८ चेंडू विरुद्ध आरसीबी, २०१९
२८ चेंडू विरुद्ध केकेआर, २०१९
२८ चेंडू विरुद्ध पंजाब, २०२०
याखेरीज बेअरस्टोने पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करताना २२ चेंडू खेळत ५९ धावा चोपल्या. या धावा करत तो आयपीएल २०२२मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला. या यादीत दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स संघाचा जोस बटलर आहे. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये ५४ धावांची खेळी केली होती.
दरम्यान बेयरस्टोच्या ६६ धावांव्यतिरिक्त लियाम लिविंगस्टोनने ७० धावा फटकावल्या. ४२ चेंडू खेळताना ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने त्याने ही मोठी खेळी केली. बेयरस्टो आणि लिविंगस्टोनच्या या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पंजाबने २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर २०९ धावा केल्या. बेयरस्टो आणि लिविंगस्टोनला वगळता पंजाबचे इतर फलंदाज मात्र विशेष योगदान देऊ शकले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
बेअरस्टोने दाखवली आयपीएलमधील आपली ‘पॉवर’, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्यात बनला ‘टॉपर’
‘त्याच्याकडे गती आहे, पण परिपक्व बनायला अजून वेळ लागेल’, उमरान मलिकची शमीने केली पाठराखण