---Advertisement---

पंजाबला मोठा धक्का, जॉनी बेअरस्टो IPL 2023मधून बाहेर, ‘या’ खेळाडूची ताफ्यात एन्ट्री

Jonny-Bairstow
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा महारणसंग्राम सुरू होण्यास आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. अशात स्पर्धेपूर्वीच अनेक संघांचे खेळाडू दुखापतग्रस्त होऊन स्पर्धेबाहेर पडत आहेत. यामध्ये पंजाब किंग्स संघाचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्या नावाचाही समावेश आहे. बेअरस्टो दुखापतीमुळे आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात वृत्त आहे की, पंजाबने बेअरस्टोच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. पंजाबने बेअरस्टोच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेला खेळाडू) खेळाडू मॅथ्यू शॉर्ट याला ताफ्यात सामील केले आहे.

पंजाब किंग्सने दिली माहिती
पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. पंजाबने ट्वीट शेअर करत जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट (Matthew Short) याला संघात घेतल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला हे सांगताना खेद होत आहे की, जॉनी बेअरस्टो त्याच्या दुखापतीमुळे या आयपीएल हंगामाचा भाग बनू शकणार नाही. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि पुढील हंगामासाठी त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहोत. त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्ट याचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे.”

खरं तर, जॉनी बेअरस्टो हा आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे पंजाब किंग्स संघाला मोठा झटका बसला आहे. कारण, इंग्लंडचा हा यष्टीरक्षक फलंदाज एकट्याच्या जोरावर संघासाठी सामना पालटण्याची क्षमता राखतो. बेअरस्टोला पंजाबने आयपीएल 2022च्या मेगा लिलावात 6.75 कोटी रुपयांना ताफ्यात घेतले होते. मात्र, पंजाबसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, आयपीएल 2023मध्ये लियाम लिव्हिंगस्टोन संपूर्ण हंगामात उपलब्ध राहणार आहे.

आयपीएलची सुरुवात
आयपीएल 2023 स्पर्धेबाबत बोलायचं झालं, तर 31 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ आमने-सामने असणार आहेत. याव्यतिरिक्त पंजाब किंग्स संघाचा स्पर्धेतील पहिला सामना 1 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेसाठी चाहत्यांची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. (Jonny Bairstow ruled out of IPL 2023 Australia’s Matthew Short named his replacement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: चेन्नईत पाऊल ठेवताच स्टोक्सचा राडा सुरू! नेट्समध्येच लावला षटकारांचा धडाका
धोनीला कोणती गोष्ट बनवते सर्वात वेगळा कर्णधार? खुद्द गावसकरांनी सांगितलंय कारण, जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---