धरमशाला येथे खेळला जात असलेला इंग्लंड विरुद्ध बांगलादेश हा सामना इंग्लंडचा विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्यासाठी खूपच खास आहे. या सामन्यात त्याने खास पराक्रम गाजवला आहे. त्याने संघासाठी तडाखेबंद अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, बेअरस्टोचा हा इंग्लंडसाठी 100वा वनडे सामना आहे. त्यामुळे हे अर्धशतक त्याच्यासाठी आणखीच खास आहे.
बेअरस्टोचे शानदार अर्धशतक
जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडसाठी सलामीला उतरला. त्याने यावेळी कोणतीही घाई न करता संघाचा धावफलक हलता ठेवत आपले अर्धशतक साकारले. त्याने 54 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 50 धावा चोपल्या. हे त्याचे वनडे कारकीर्दीतील 16वे अर्धशतक ठरले.
Let him cook 👨🍳 #EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/bfde3Bpfwe
— England Cricket (@englandcricket) October 10, 2023
Fifty by Jonny Bairstow!
A half century in his 100th match – a brilliant occasion to bring that up. What a player, Bairstow! pic.twitter.com/fcICkqCdmK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 10, 2023
मात्र, तो जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. त्याने आपल्या खेळीत फक्त अधिकच्या 2 धावा जोडल्या. त्याने 59 चेंडूत 52 धावा करून तो बाद झाला. त्याला 18वे षटक टाकत असलेल्या बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने पाचव्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद केले.
विश्वचषकातील दुसरा सामना
बेअरस्टो बांगलादेशविरुद्ध विश्वचषकातील आपला दुसरा सामना खेळत आहे. यापूर्वी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने 35 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला होता. त्याच्या खेळीत 1 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.
बेअरस्टोची वनडे कारकीर्द
बेअरस्टो याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडकडून 99 सामने खेळले. त्यात त्याने 44.95च्या सरासरीने 3686 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 11 शतके आणि 15 अर्धशतकांचा पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे, नाबाद 141 ही त्याची वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. (Jonny Bairstow score half century in his 100th match )
हेही वाचा-
भारताला धक्का! पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वी शुबमनच्या तब्येतीविषयी समोर आली मोठी माहिती, लगेच वाचा
CWC 23 सामना सातवा: बांगलादेशने जिंकला टॉस, धरमशालेत बटलरसेना करणार बॅटिंग; दोन्ही संघात महत्त्वाचा बदल