मंगळवारी (दि. 10 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातवा सामना इंग्लंड विरुद्ध बांगलादेश संघात खेळला जाणार आहे. हा सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक शाकिब अल हसन याने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात बांगलादेश संघ एक बदलासह उतरला आहे. महमदुल्लाह याच्या जागी महेदी हसनला ताफ्यात सामील केले आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघातही बदल आहे. मोईन अली याच्या जागी रीस टोप्ले याला संधी मिळाली आहे.
स्पर्धेतील कामगिरी
उभय संघांची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर गतविजेता इंग्लंड संघ उद्घाटनाच्या सामन्यातच गत-उपविजेत्या न्यूझीलंड संघाविरुद्ध 9 विकेट्सने पराभूत झाला होता. या सामन्यात इंग्लंडकडून एकट्या जो रूट (77) यानेच अर्धशतकी खेळी साकारली होती. इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नव्हता. दुसरीकडे, बांगलादेश संघ स्पर्धेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडविरुद्ध भिडण्यासाठी तयार आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला होता. अशात या सामन्यात इंग्लंड पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल, तर बांगलादेश आपला दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. (Bangladesh have won the toss and have opted to field Against England)
वनडे विश्वचषकातील सातव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड
जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोप्ले
बांगलादेश
तंजीद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन (कर्णधार), मेहिदी हसन मिराज, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद ह्रदोय, महेदी हसन, तस्कीन अहमद, शोरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान
हेही वाचा-
IND vs AFG: विश्वचषकातील दुसऱ्या युद्धासाठी टीम इंडिया सज्ज, अफगाणिस्तानविरुद्ध दिल्ली करणार काबीज!
CWC 2023: पाकिस्तान-श्रीलंकेत हैद्राबादमध्ये रंगणार ‘एशियन वॉर’, दोन्ही संघ विजयासाठी आतुर