---Advertisement---

क्षेत्ररक्षणाचा बादशहा होणार टीम इंडियाचा कोच?

On: गुरूवार, जुलै 25, 2019 1:33 PM
---Advertisement---

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडशनिंग प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक या पदांसाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.

त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे.

ऱ्होड्स हा नेहमीच त्याच्या अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. त्याला एकदा त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच 1992 च्या विश्वचषकात त्याने पाकिस्तानच्या इंझमाम उल-हकला हवेत उडी मारत केलेले धावबाद प्रसिद्ध आहे.

ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेचे आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच त्याने केनियाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याबद्दल क्रिकेटनेक्स्ट वेबसाईटशी बोलताना ऱ्होड्स म्हणाला, ‘हो, मी भारताच्या नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या पदासाठी अर्ज केला आहे. माझी पत्नी आणि मी या देशावर प्रेम करतो. या देशाने आम्हाला खूप काही दिले आहे. आमच्या दोन मुलांचा भारतात जन्म झाला आहे.

सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक आर श्रीधर आहेत. त्यांचा सध्याचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाचा करार विश्वचषकानंतर 45 दिवस वाढवण्यात आला आहे. त्यामुळे  पुढील महिन्यात होणाऱ्या भारताच्या विंडीज दौऱ्यासाठी ते भारताचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असतील.

त्यांच्याबरोबरच बीसीसीयने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांच्या करारात देखील 45 दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे विंडीज दौऱ्यासाठी रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ भारतीय संघाबरोबर कायम असतील.पण त्यानंतर बीसीसीआय नवीन प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

प्रो कबड्डी: भाऊ माझा पाठीराखा! सुरज देसाईने मोडला भाऊ सिद्धार्थचा विश्वविक्रम!

भारतीय खेळाडूनंतर इंग्लंडसाठी आणि इंग्लंडविरुद्ध खेळणारा तो ठरला दुसराच खेळाडू

गौतम गंभीर आता क्रिकेटच्या नाही तर उतरला कबड्डीच्या मैदानात!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment