---Advertisement---

‘आता जॉस इंग्लंडला बनवणार क्रिकेट जगतातला बॉस!’ इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून नव्या कर्णधाराची घोषणा

On: गुरूवार, जून 30, 2022 9:51 PM
Jos-Butler
---Advertisement---

जोस बटलरला इंग्लंड संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. अलीकडेच इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत टी२० आणि वनडे कर्णधाराची जागा रिक्त होती. आता बटलरकडे ही जबाबदारी आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी२०  आणि एकदिवसीय मालिका (IND vs ENG) ७ जुलैपासून सुरू होत आहे. बटलर टीम इंडियाविरुद्धच कर्णधारपदाची सुरुवात करेल. 

जॉस बटलरचा टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. यापूर्वी त्याने आयपीएल २०२२ मध्ये ४ शतकांच्या मदतीने ८५० हून अधिक धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो इंग्लंडचा दुसरा पुरुष खेळाडू आहे. त्याच्याशिवाय केवळ डेव्हिड मलान हेच ​​करू शकले आहेत. त्याने इंग्लंडकडून ८८ टी२० आणि १५१ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

आमचा संघ खूप मजबूत आहे
कर्णधार बनल्यावर जॉस बटलर म्हणाला की, “गेल्या ७ वर्षांत इऑन मॉर्गनच्या उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. आम्हा सर्वांसाठी तो अविस्मरणीय काळ होता. तो एक प्रेरणादायी कर्णधार आहे आणि त्याच्या हाताखाली खेळणे खूप चांगले आहे. त्याच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तो म्हणाला की आमचा मर्यादित षटकांचा संघ खूप मजबूत आहे. मी पुढील आठवड्यात भारताविरुद्ध आणि त्यानंतर महिन्याच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.”

दरम्यान, ३१ वर्षीय जोस बटलरने वनडेमध्ये १० आणि टी२० मध्ये १ शतक झळकावले. त्याने १५१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१च्या सरासरीने ४१२० धावा केल्या आहेत. २१ अर्धशतकेही झळकावली आहेत. स्ट्राइक रेट १२१ आहे. त्याने जवळपास १५० षटकारही मारले आहेत. टी२० बद्दल बोलायचे झाले तर त्याने ८८ सामन्यात २१४० धावा केल्या आहेत. १५ अर्धशतके केली आहेत. स्ट्राइक रेट १४१चा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पंत विराट अन् बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी२०ला मारणार दांडी, वाचा कोणकोणत्या खेळाडूंना मिळणार संधी

‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका

SL vs AUS | दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होण्याआधीच स्टेडियममध्ये मोठा अपघात, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---