मंगळवारी (२९ मार्च) इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील पाचवा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने सामने होते. या हंगामात सनरायझर्स हैदराबाद ब गटात आहे, तर राजस्थान अ गटात आहे. त्यामुळे या हंगामातील साखळी फेरीत या दोन संघात होणारा हा एकमेव सामना होता. या सामन्यादरम्यान राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलर याने शानदार खेळी खेळत नवा विक्रम केला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे राजस्थानकडून यशस्वी जयस्वास आणि जोस बटलर सलामीला फलंदाजीसाठी आले. पावरप्लेमध्ये हैदराबादच्या भेदक माऱ्याचा सामना करताना या जोडीने वेगाने धावा कुटल्या. त्यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची शानदार भागीदारीही झाली. जयस्वालच्या विकेटसह त्यांची भागीदारी मोडली.
जयस्वालनंतर बटलरही ३५ धावा करून बाद झाला. २८ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ३ षटकार मारत त्याने ही शानदार खेळी खेळली. पुढे नवव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमरान मलिकने निकोलस पूरनच्या हातून त्याला झेलबाद केले. मात्र या छोटेखानी खेळीसह बटलरने त्याच्या आयपीएलमधील २००० धावा पूर्ण केल्या आहेत.
६५ आयपीएल डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने हा पराक्रम केला आहे. यासह तो आयपीएलमध्ये सर्वात कमी डावात २००० धावांचा आकडा गाठणारा सातवा क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेल, शॉन मार्श, केएल राहुल, सचिन तेंडूलकर, रिषभ पंत आणि शेन वॉटसन यांनी हा विक्रम केला आहे.
We love you 2000, @josbuttler! ❤️
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 29, 2022
२००० आयपीएल धावांसाठी सर्वात कमी डाव
४८: ख्रिस गेल
५२: शॉन मार्श
६०: केएल राहुल
६३: सचिन तेंडुलकर
६४: रिषभ पंत, शेन वॉटसन
६५: जोस बटलर*
राजस्थान रॉयल्स संघ: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
माजी क्रिकेटरने सांगितली पाकिस्तानच्या आझमची आयपीएलमधील किंमत; म्हणाला, ‘तो १५-२० कोटींना…’
आयपीएल म्हणजे पैसे छापण्याचीच मशीन; मीडिया हक्कांमधून बीसीसीआय होणार मालामाल