इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बारावा सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात राजस्थानकडून पुन्हा एकदा जोस बटलर याने शानदार प्रदर्शन केले. सलामीला फलंदाजीला येत त्याने या सामन्यात विशेष शतक करत नवा विक्रम आपल्या खात्यात नोंदवला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून बेंगलोरने प्रथम गोलंदाजी निवडली होती. परिणामी राजस्थानकडून युवा यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर (Jos Buttler) सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. बेंगलोरच्या एकाहून एक जबरदस्त गोलंदाजांपुढे जयस्वालचा टिकाव लागला नाही आणि तो वैयक्तिक ४ तर संघाच्या ६ धावांवर डेविड विलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र बटलरने एक बाजू धरून ठेवली आणि संघासाठी महत्वपूर्ण खेळी खेळली.
आपल्या खेळीदरम्यान त्याने वानिंदू हसरंगा आणि आकाश दीप यांच्या षटकात एक-एक खणखणीत षटकार ठोकला. या २ षटकारांसह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील १०० षटकारांचा आकडा (100 Sixes In IPL) गाठला आहे. यासह तो आयपीएलमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारणारा अकरावा विदेशी खेळाडू बनला आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेल सर्वाधिक ३५७ षटकारांसह या विक्रमाच्या यादीत अव्वलस्थानी (Most Sixes In IPL By Overseas Players) आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे परदेशी क्रिकेटर:
३५७- ख्रिस गेल
२५१ – एबी डिव्हिलियर्स
२१५- कायरन पोलार्ड
२०१- डेविज वॉर्नर
१९०- शेन वॉटसन
१५४ – आंद्रे रसेल
१३०- ब्रेंडन मॅक्युलम
११७- ड्वेन स्मिथ
११२- ग्लेन मॅक्सवेल
१०३- फाफ डु प्लेसिस
१००- जोस बटलर*
आयपीएल २०२२चा पहिला शतकवीर आहे बटलर
आयपीएल २०२२ मध्ये पहिले शतक करण्याचा पराक्रम बटलरने केले आहे. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करताना १०० धावा (Jos Buttler Century) केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने ६८ चेंडू खेळले आणि ५ षटकार व ११ चौकारही मारले होते. यासह बटलर आयपीएल २०२२ मध्ये शतक करणारा पहिला फलंदाज ठरला (First Century Of IPL 2022) होता.
हे बटलरचे आयपीएलमधील दुसरे शतक होते. तसेच राजस्थान संघाकडूनही हे त्याचे दुसरेच शतक होते. यापूर्वी त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १२४ धावा फटकावत आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई- पुणे प्रवासात सचिन तेंडुलकरचा ‘आम्ही डोलकर’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
RRvsRCB | नाणेफेक जिंकत फाफचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, असा आहे राजस्थान आणि बेंगलोरचा संघ