---Advertisement---

कोलकाताच्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध बटलरचा खणखणीत षटकार; १०० मीटर दूर जाऊन पडला चेंडू

On: सोमवार, एप्रिल 18, 2022 9:25 PM
Jos-Buttler
---Advertisement---

सोमवारी (दि. १८ एप्रिल) आयपीएलचा ३०वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीला राजस्थान संघ आला. यावेळी राजस्थानच्या जोस बटलरने शानदार फटकेबाजी करत एक खणखणीत षटकार मारला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

यावेळी राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलर (Jos Buttler) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) सलामीला आले होते. बटलरने यावेळी पडिक्कलची साथ देत ५९ चेंडूत ९७ धावांची भागीदारी रचली. यामध्ये बटलरच्या ६७ आणि पडिक्कलच्या २४ धावांचा समावेश होता. या खेळीदरम्यान बटलरने कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला जोरदार गगनचुंबी षटकार मारला.

हा षटकार राजस्थानच्या डावाच्या तिसऱ्या षटकातील होता. उमेश यादव कोलकाताकडून आपले दुसरे षटक टाकण्यासाठी आला होता. उमेशच्या षटकादरम्यान बटलरने संघाच्या धावसंख्येत वाढ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याने या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर जोरदार फटका खेळला. हा षटकार थेट १०० मीटर लांबीचा होता. त्याच्या या षटकादरम्यानचा व्हिडिओ आयपीएलने त्यांच्या वेबसाईटवर शेअर केला आहे.

https://twitter.com/MohitKu38157375/status/1516060538568327173?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1516060538568327173%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fjoss-buttler-100-metre-six-ipl%2F

बटलरच्या षटकाराचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बटलरने मारलेला हा चेंडू जवळपास ताशी १४० किमी वेगाने फेकण्यात आला होता. विशेष म्हणजे, उमेशच्या या षटकात राजस्थानला एकूण १६ धावा मिळाल्या. त्यात जोस बटलरच्या २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. या सामन्यात बटलरने आपले शतकही झळकावले. त्याने ६१ चेंडूत १०३ धावा केल्या. यामध्ये ५ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. बटलरचे हे आयपीएलमधील तिसरे शतक होते.

बटलरची आयपीएल कारकीर्द
बटलरच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ७१ सामन्यातील ७० डावात फलंदाजी करताना ३८.४१च्या सरासरीने २३४३ धावा चोपल्या आहेत. यामध्ये ३ शतकांचा आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

इकडं सामना खेळत होता विंडीजचा विश्वविजेता खेळाडू, तिकडं पठ्ठ्याची गाडीच गेली चोरीला, पदार्पणातच ‘गोल्डन डक’

आयपीएलप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! कोरोना पॉझिटिव्ह मिशेल मार्शचा आरटी- पीसीआर रिपोर्ट आला

तोडफोड गोलंदाजी! लॉकी फर्ग्युसनने टाकला खतरनाक यॉर्कर, तुटली अंबाती रायुडूची बॅट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---