---Advertisement---

डी कॉकच्या निवृत्तीने दोन खेळाडूंना बसला धक्का; दिली अशी प्रतिक्रिया

On: रविवार, जानेवारी 2, 2022 5:18 PM
de kock test
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या (centurion)  मैदानावर पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. हा कसोटी सामना झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती (Quinton dekock retirement) जाहीर केली. अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान जोस बटलर आणि हाशिम आमला यांनी देखील या निवृत्तीनंतर मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

क्विंटन डी कॉक हा दक्षिण आफ्रिका संघातील भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ खेळाडू होता. पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुढील २ कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला त्याची कमतरता जाणवू शकते.

क्विंटन डी कॉकच्या निवृत्तीमुळे जोस बटलर निराश

क्विंटन डी कॉक आणि त्याची पत्नी साशा डी कॉक यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. ज्यामुळे त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अचानक निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने सर्वांना आश्चर्य झाले आहे. याबाबत बोलताना जोस बटलर (Jos Buttler)  म्हणाला की, “हा क्विंटन डी कॉकचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु, क्रिकेट समर्थक म्हणून मी खूप निराश आहे. मला त्याला कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना यष्टीरक्षण करताना पाहायला आवडतं. क्रिकेटविश्वात नेहमीच त्याच्या नावाचा उल्लेख केला जाईल.”

तसेच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला (Hashim Amla)  म्हणाला की, “मध्यक्रमात आमचे दोन सर्वश्रेष्ठ फलंदाज टेंबा बावूमा आणि डी कॉक आहे. आता डी कॉकने कसोटी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे संघाचा मध्यक्रम आणखी कमकुवत झाला आहे. आता टेंबा बवूमाला फलंदाजी क्रमात वर यावे लागेल. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा मध्यक्रम मजबूत होईल.”

महत्वाच्या बातम्या :

यंदाचं वर्ष विश्वचषकाचं! क्रिकेट ते हॉकी २०२२ मध्ये रंगणार मोठ्या स्पर्धा, जाणून घ्या एकाच क्लिकवर

माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “निवडसमितीने विराट-रोहित वादाच्या आगीत तेल ओतले”

हे नक्की पाहा :

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---