राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना आज दिल्लीत खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने सफाईदार खेळ करत ५५ धावांनी विजय मिळवला. तिन्ही आघाड्यांवर राजस्थानने हैद्राबादपेक्षा सरस खेळ केला. पहिल्या डावात राजस्थानने २० षटकात ३ बाद २२० धावांचा डोंगर उभा केला होता.
या प्रत्युतरात हैद्राबादला केवळ ८ बाद १६५ धावाच करता आल्या. त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे हैद्राबादला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात फिल्डिंगच्या चुकाही हैद्राबादला भोवल्या.
हैदराबादच्या खेळाडूंनी सोडले झेल
राजस्थानकडून या डावात सलामीवीर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या खेळी निर्णायक ठरल्या. या दोघांनी दुसर्या विकेटसाठी तब्बल १५० धावांची भागीदारी केली. बटलरने ६४ चेंडूत १२४ धावांची तर सॅमसनने ३३ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. याच खेळी राजस्थानचा स्कोर २०० धावांपर्यंत नेण्यात निर्णायक ठरल्या. मात्र यात त्यांना हैद्राबादच्या खराब फिल्डिंगची साथ लाभली.
हैद्राबादच्या खेळाडूंनी खराब फिल्डिंगचे प्रदर्शन करतांना बटलर आणि सॅमसन या दोघांनाही एकेकदा जीवदान दिले. बटलरला डावाच्या पाचव्या षटकात जीवदान मिळाले. राशिद खानच्या गोलंदाजीवर बटलरने मारलेला फटका हवेत गेला होता. मात्र लॉन्ग ऑनला उभ्या असलेल्या विजय शंकरने झेल सोडला आणि बटलरला जीवदान मिळाले. नंतर त्याने याचा पुरेपूर लाभ उठवत शतक ठोकले. तर दुसरीकडे कर्णधार सॅमसनला मनीष पांडेने जीवदान दिले. १०व्या षटकांत सॅमसनने मारलेला फटका पांडेच्या सरळ हातात आलेला होता. मात्र त्याच्याकडून सोपा झेल सुटला. या जीवदानाचाही राजस्थानला फायदा झाला.
https://www.iplt20.com/video/237697/when-sanju-buttler-were-dropped
राजस्थानचा सफाईदार विजय
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने या सामन्यात तिन्ही आघाड्यांवर सरस खेळ करत सनरायझर्स हैद्राबादला मात दिली. प्रथम फलंदाजी करतांना राजस्थानने ३ बाद २२० धावा केल्या होत्या. यात जोस बटलरच्या १२४ तर संजू सॅमसनच्या ४८ धावांचा समावेश होता. या लक्ष्याचा पाठलाग करतांना हैद्राबादला ८ बाद १६५ धावा करता आल्या. राजस्थानकडून मुस्तफिझुर रहमान आणि ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान संघांसाठी असा रॉयल कारनामा करणारा जोस बटलर ठरला तिसराच परदेशी
बटलरच्या शतकाने विलियम्सनवर ओढवली नामुष्की, नावे झाला ‘हा’ नकोसा विक्रम