रविवारी (२९ मे) आयपीएल २०२२चा अंतिम सामना खेळवला गेला. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे हा सामना पार पडला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या या चुरशीच्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर याची बॅट चांगलीच तळपली. त्याने दमदार खेळी करत संघाला १३० धावा धावफलकावर लावण्यात मदत केली. या खेळीसह त्याने सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅपही जिंकली आहे.
बटलरने (Jos Buttler) गुजरातविरुद्ध सलामीला फलंदाजीला येत ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार ठोकले. यासह १७ सामन्यांमध्ये त्याने एकूण ८६३ धावांचा आकडा गाठला आहे. ४ शतके व ४ अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या आहेत. यासह तो आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. ही विलक्षण कामगिरी करत त्याने ऑरेंज कॅप (Orange Cap) पटकावली आहे.
ऑरेंज कॅप विजेता (Orange Cap Winner) बनत बटलरने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आयपीएलच्या १५ हंगामांच्या इतिहासात राजस्थान संघाकडून ऑरेंज कॅप जिंकणारा (Rajasthan Royals First Player) बटलर पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही फलंदाजाला हा मान मिळवता आला नव्हता. याखेरीज तो ऑरेंज कॅप जिंकणारा इंग्लंडचा पहिलाच (England First Player) क्रिकेटपटूही आहे.
#आतापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे फलंदाज –
आयपीएल २००८- शॉन मार्श (६१६ धावा)
आयपीएल २००९- मॅथ्यू हेडन (५७२ धावा)
आयपीएल २०१०- सचिन तेंडुलकर (६१८ धावा)
आयपीएल २०११- ख्रिस गेल (६०८ धावा)
आयपीएल २०१२- ख्रिस गेल ( ७३३ धावा)
आयपीएल २०१३- मायकल हसी ( ७३३ धावा)
आयपीएल २०१४- रॉबिन उथप्पा (६६० धावा)
आयपीएल २०१५- डेविड वॉर्नर (५६२ धावा)
आयपीएल २०१६- विराट कोहली (९७३ धावा)
आयपीएल २०१७- डेविड वॉर्नर (६४१ धावा)
आयपीएल २०१८- केन विलियम्सन (७३५ धावा)
आयपीएल २०१९- डेविड वॉर्नर (६९२ धावा)
आयपीएल २०२०- केएल राहुल (६७० धावा)
आयपीएल २०२१- ऋतुराज गायकवाड (६३५ धावा)
आयपीएल २०२२- जोस बटलर (८६३ धावा)
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला






