इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार जोस बटलर सध्या आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं एक मोठी घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड अर्थात ईसीबीनं सांगितलं की जोस बटलर त्याचं नाव बदलत आहे. जोस बटलरनं आपलं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं बोर्डानं अधिकृत निवेदन जारी करून सांगितलं.
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं इंस्टाग्रामवर अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत जोस बटलरचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. व्हिडिओत बटलर म्हणतोय की, त्याचं नाव नेहमीच चुकीच्या पद्धतीनं घेतल्या गेलं. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 वर्ष झाली, परंतु आजही त्याचं नाव चुकीचं उच्चारलं आणि लिहिलं जातं. बटलरनं सांगितलं की, त्याचं नाव ‘जोश बटलर’ नसून ‘जोस बटलर’ आहे. परंतु आजही सगळीकडे त्याला ‘जोश’ या नावानंच ओळखलं जातं. त्यामुळे हा गोंधळ दूर करण्यासाठी त्यानं स्वत:हून आपलं नाव ‘जोस’ ऐवजी ‘जोश’ असं करण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ ईसीबीनं शेअर केला आहे, जो तुम्ही खाली पाहू शकता.
View this post on Instagram
ईसीबीच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला गेला असला तरी, जोस बटलरनं खरंच त्याचं नाव बदललं की नाही याबाबात काहीही सांगता येत नाही. कारण नाव बदलण्याची घोषणा 1 एप्रिल रोजी करण्यात आली, जो दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणजेच मूर्ख बनवण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवतो आणि नंतर त्याचा आनंद घेतो. हे प्रकरणही त्याचाच भाग असल्याचं दिसतं.
जोस बटलरचं पूर्ण नाव ‘जोसेफ चार्ल्स बटलर’ आहे. परंतु ब्रिटनमध्ये जोसेफ हे नाव ‘जो’ म्हणूनही लिहिलं जातं, जसं ‘जो रुट’ लिहितो. आता बटलरच्या या केसमध्ये काही तथ्य आहे का? बटलरनं खरंच नाव बदललंय का? हे येणार काळच सांगेल.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाता-राजस्थान सामन्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक कामगिरी!…टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत असं कोणीही करू शकलं नाही