इंग्लंड संघाने बुधवारी (8 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेत विजय पाहिला. त्याआधी इंग्लंडला सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडलेल्या स्पर्धेच्या 40 व्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्स संघाला 160 धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा इंग्लंडचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. या विजयानंतर कर्णधार जोस बटलर याने कर्णधार म्हणून आपल्या भविष्याबद्दल मोठे वक्तव्य केले.
नेदरलँड्सविरूद्ध विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना जोस बटलर याला त्याच्या कर्णधार म्हणून भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना तो म्हणाला,
“नक्कीच मला तेथे राहायला आवडेल. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रॉब की गुरुवारी भारतात येत आहेत. त्यांच्यासोबत चांगलीच सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. यावेळी प्रशिक्षक देखील असतील.”
बटलर याच्याच नेतृत्वात इंग्लंडने मागील वर्षी टी20 विश्वचषक जिंकला होता. पुढील वर्षी होणारा टी20 विश्वचषक व त्यानंतर 2025 चॅम्पियन ट्रॉफी या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बटलर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
इंग्लंडचा दणदणीत विजय
इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संघाने प्रथम फलंदाजी कराना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 339 धावा केल्या. इंग्लंडला हे आव्हान मिळवून देण्यात बेन स्टोक्स (108) आणि ख्रिस वोक्स (51) यांचे मोलाचे योगदान होते. तसेच, नेदरलँड्स संघाने 37.2 षटकात सर्व विकेट्स गमावत 179 धावा केल्या. नेदरलँड्सकडून तेजा निदामानुरुने 34 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक नाबाद 41 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून गोलंदाजी करताना मोईन अली आणि आदिल रशीद चमकले. दोघांनीही प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच, डेविड विलीने 2, तर ख्रिस वोक्सने 1 विकेट घेतली.
(Jos Buttler confirms he’ll like to continue captaining England in white ball cricket)
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप