---Advertisement---

जॉस द बॉस; श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत ‘या’ विक्रमात बनला इंग्लंडचा नंबर १ सलामीवीर

On: मंगळवार, नोव्हेंबर 2, 2021 8:49 AM
---Advertisement---

सोमवारी (१ नोव्हेंबर) शारजहाच्या मैदानावर रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघांतील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत श्रीलंका संघावर २६ धावांनी विजय मिळवला. सलग ४ सामन्यात विजय मिळवत इंग्लंड संघ आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे. दरम्यान या डावात इंग्लंड संघाकडून तुफानी खेळी शतकी खेळी करणाऱ्या जोस बटलरच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर हा टी-२० क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याचे रौद्ररूप पाहायला मिळाले. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत तुफानी शतक झळकावले. इंग्लंड संघाकडून डावाची सुरुवात करताना त्याने ६७ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि ६ षटकारांचा साहाय्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघासाठी सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणाऱ्या सलामीवीर फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान गाठले आहे.

जोस बटलरने हा मोठा कारनामा २६ डावात केला आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा आणखी एक विस्फोटक फलंदाज ॲलेक्स हेल्स आहे, ज्याने हा कारनामा ३२ डावात केला होता. तसेच तिसऱ्या स्थानी जेसन रॉय आहे. त्याने हा पराक्रम ४२ डावात केला होता.

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघासाठी सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज
२६ डाव – जोस बटलर*
३२ डाव – ॲलेक्स हेल्स
४२ डाव – जेसन रॉय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरने नाबाद १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार ओएन मॉर्गनने ४० धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६३ धावा करण्यात यश आले होते.या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाकडून वाहिंदू हसरंगाने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर भानुका राजपक्षेने २६ धावांचे योगदान दिले. परंतु श्रीलंका संघाला हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. या सामन्यात इंग्लंड संघाने २६ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंकेविरुद्ध बटलरची बॅट तळपली! डावाच्या अखेरच्या चेंडूवर षटकारासह शतक पूर्ण करत विक्रमांना घातली गवसणी

टी२० विश्वचषक: श्रीलंकेवर २६ धावांनी विजयासह इंग्लंडने सेमीफायनलचे तिकीट केले पक्के

Video: …आणि इथेच सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले, सीमारेषेजवळील तो अद्भुत कॅच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---