गुरुवारी (१५ एप्रिल) आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला पहिला विजय साजरा केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने एक अप्रतिम झेल घेत चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बटलरचा अप्रतिम झेल
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकत दिल्लीला फलंदाजीचे निमंत्रण दिले. मात्र, नियमित अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत राहिले. सातव्या षटकातील पाचवा चेंडू मुस्तफिझुर रहमानने काहीसा हळुवार टाकला. फलंदाजी करत असलेल्या अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसच्या बॅटला लागून हा चेंडू वर उडाला. लाँग ऑफच्या दिशेने ३० यार्डावर क्षेत्ररक्षण करत असलेल्या जोस बटलरने धावत येऊन सूर मारत हा झेल पकडला.
— Cricsphere (@Cricsphere) April 15, 2021
फलंदाजीत अपयशी ठरला बटलर
टी२० क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी सलामीवीर म्हणून खेळणारा बटलर पंजाब विरुद्धच्या सामन्यात राजस्थानसाठी मधल्या फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, बेन स्टोक्स दुखापतीमुळे या सामन्याला मुकल्याने बटलरला सलामीवीर म्हणून बढती मिळाली. या संधीचा मात्र तो फायदा उचलू शकला नाही आणि ७ चेंडूत केवळ २ धावा काढून ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हाती झेल देऊन बाद झाला.
राजस्थानचा सोपा विजय
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १४७ धावा काढल्या. राजस्थानसाठी जयदेव उनाडकटने सर्वाधिक ३ बळी मिळविले.
प्रत्युत्तरात, डेव्हिड मिलर (६२) व ख्रिस मॉरिस (नाबाद ३६) यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान अखेरच्या षटकात पूर्ण केले. जयदेव उनाडकट सामन्याचा मानकरी ठरला. दिल्लीचा हा स्पर्धेतील पहिला पराभव आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवागचा हिंदी गाण्यातून सनरायझर्सला छुपा संदेश, केले ‘हे’ ट्विट
वामीकाबद्दल बोलताना ‘बाप’माणूस विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, ‘ती जेव्हा हसते तेव्हा…’
सीएसकेच्या फलंदाजांना अडचणीत आणणारा फझल फारूखी आहे तरी कोण?, घ्या जाणून