---Advertisement---

वामीकाबद्दल बोलताना ‘बाप’माणूस विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, ‘ती जेव्हा हसते तेव्हा…’

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 11:56 PM
Virat Kohli and Anushka Sharma with daughter Vamika
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी नेहमीच चर्चेत असते. जानेवारी महिन्यात यांच्या आयुष्यात कन्येच्या रुपात नव्या पाहुणीचे आगमन झाले. तिचे नाव त्यांनी वामीका असे ठेवले. या चिमुकल्या वामीकाबद्दल आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त असणाऱ्या तिच्या वडीलांनी म्हणजेच विराट कोहलीने भावना व्यक्त केल्या आहेत.

विराट आणि अनुष्का यांनी वमीकाला प्रसिद्धी पासून दूर ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे दोघेही वामीका सोबत आपले फोटो सोशल मीडियावर फार कमीवेळा शेअर करत असतात. विराट कोहलीने आयपीएलपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “आयुष्यात खूप बदल झाले आहेत. एक मूल फक्त आईचीच जबाबदारी नसते तर ती वडिलांची देखील जबाबदारी असते. वामीकाच्या जन्मानंतर आमच्या आयुष्यात खूप बदल आले आहेत. आता मला आणि अनुष्काला मिळून आणखी एका व्यक्तीच्या आयुष्याची काळजी घ्यायची आहे. जो एक सुखद अनुभव आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “आपल्या मुलाला हसताना पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. वामीका हसत असते, तेव्हा मला कसं वाटतं याबद्दल सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीये. हा एक अद्भुत क्षण असतो.”

विराट कोहली सध्या आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे तर दुसरीकडे अनुष्का शर्मा आपल्या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तसेच वामिकाचा जन्म झाल्याची गोड बातमी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. तिच्या जन्मावेळी विराटने पालकत्व रजाही घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या –

सीएसकेच्या फलंदाजांना अडचणीत आणणारा फझल फारूखी आहे तरी कोण?, घ्या जाणून

डिविलियर्स, धोनीलाही भारी पडला रिषभ पंत; राजस्थानविरुद्ध अर्धशतक करत केला ‘हा’ विक्रम

टीम इंडियाचे ‘हे’ २८ खेळाडू होणार करोडपती, बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---