---Advertisement---

टीम इंडियाचे ‘हे’ २८ खेळाडू होणार करोडपती, बीसीसीआयच्या वार्षिक मानधन कराराची घोषणा

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 9:18 PM
---Advertisement---

गुरुवारी (१५ एप्रिल) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी वरिष्ठ भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मागील दोन वर्षांप्रमाणेच या वर्षीही मानधनाच्या ४ श्रेणी करण्यात आल्या आहेत. यात अ+, अ, ब, आणि क अशा श्रेणी असतील.

या करारानुसार अ+ श्रेणीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या तीन खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या करारानुसार नियोजित कालावधीसाठी ७ कोटी रुपयांचे मानधन मिळेल.

https://twitter.com/BCCI/status/1382709303077859328

त्याचबरोबर बीसीसीआयने यावर्षी अ श्रेणीमध्ये १० खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये आर अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांचा समावेश आहे. अ श्रेणीत असलेल्या या १० क्रिकेटपटूंना ५ कोटींचे मानधन मिळेल.

हार्दिकला यंदा ब श्रेणीतून अ श्रेणीमध्ये बढती मिळाली आहे. मागीलवर्षी तो ब श्रेणीमध्ये होता. तसेच मागीलवर्षी अ श्रेणीत असलेल्या भुवनेश्वर कुमारची ब श्रेणीत, तर कुलदीप यादवची क श्रेणीत घसरण झाली आहे. तसेच युजवेंद्र चहलचीही ब श्रेणीतून क श्रेणीत घसरण झाली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1382709304898248714

बीसीसीयने ब श्रेणीमध्ये ५ खेळाडूंना स्थान दिले आहे. यामध्ये वृद्धिमान साहा, उमेश यादव आणि मयंक अगरवाल हे स्थान कायम राखण्यात यशस्वी झाले आहेत. तर या श्रेणीत यंदा शार्दुल ठाकूरनेही स्थान मिळवले आहे. तो मागीलवर्षी क श्रेणीत होता. त्याचबरोबर ब श्रेणीत भुवनेश्वरही आहे. या श्रेणीतील या ५ खेळाडूंना ३ कोटींचे मानधन मिळेल.

https://twitter.com/BCCI/status/1382709307003731975

त्याचबरोबर क श्रेणीमध्ये एकूण १० क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. या श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी एवढे वार्षिक मानधन मिळणार आहे. या श्रेणीत श्रेयस अय्यर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी आणि दिपक चाहर यांनी स्थान कायम राखले आहे. तर यंदा शुबमन गिल, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनाही क श्रेणीच्या करारात स्थान मिळाले आहे. तर कुलदीप यादव आणि चहल यांचा देखील या श्रेणीत समावेश आहे.

https://twitter.com/BCCI/status/1382709308631048201

 

ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी असणाऱ्या वार्षिक मानधन करारात एकूण २८ पुरुष क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

या पुरुष क्रिकेटपटूंचा झाला वार्षिक मानधन करारात समावेश-

अ+ श्रेणी (७ कोटी) – विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा

अ श्रेणी(५ कोटी) – आर अश्विन, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत

ब श्रेणी (३ कोटी) – वृद्धिमान सहा, उमेश यादव, मयंक अगरवाल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार

क श्रेणी(१ कोटी) – श्रेयस अय्यर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, हनुमा विहारी, दिपक चाहर, शुबमन गिल, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या – 

उडता सॅमसन! हवेत उडी घेत संजू सॅमसनने घेतला शिखर धवनचा अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ

SRHच्या विकेट्स पडत होत्या अन् क्षणाक्षणाला कॅमेरा तिच्याकडे वळत होता, पाहा चर्चित ‘मिस्ट्री गर्ल’चे फोटो!

‘आधीच हॉस्पिटलमध्ये जागेची कमी, त्यात सचिनने भरती होण्याची गरज नव्हती,’ महाराष्ट्राच्या मंत्र्यांचे धक्कादायक विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---