---Advertisement---

SRHच्या विकेट्स पडत होत्या अन् क्षणाक्षणाला कॅमेरा तिच्याकडे वळत होता, पाहा चर्चित ‘मिस्ट्री गर्ल’चे फोटो!

On: गुरूवार, एप्रिल 15, 2021 6:51 PM
---Advertisement---

बुधवार (14 एपिल) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन हिने दिलेल्या रिऍक्शन बरीच चर्चा झाली. परंतु या सामन्यादरम्यान, तिच्या अजून एका रहस्यमयी मुलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या. जेव्हाही काव्या मारनकडे कॅमेरा वळत असते, तेव्हा तिच्या बाजूला एक नवा चेहरा दिसून येत होता आणि पाहता पाहता आणखी एक नवीन रहस्यमयी मुलगी (मिस्ट्री गर्ल) चर्चेत आली आहे.

सामान्यातील ही नवीन रहस्यमयीन मुलगी काव्या मारनसह हैदराबाद संघाला पाठिंबा देताना दिसली. सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या या नव्या रहस्यमयीन मुलीबद्दल सर्वांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अनेकांनी तिच्या फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://twitter.com/kyonbtaye7/status/1381266319257923587?s=20

https://twitter.com/Kanthammaaaaa/status/1382393813835010052?s=20

विशेषत: हैदराबादच्या फलंदाजीच्या वेळी 17 व्या षटकात जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांचा एकामागोमाग बळी गेल्यानंतर काव्या मारनसह या मुलीचाही चेहरा निराश झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/RajeshSN1999/status/1382390281824194564?s=20

बुधवारी (14 एप्रिल) रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करीता उतरलेल्या बेंगलोर संघाने हैदराबादसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा करु शकला. त्यामुळे हैदराबाद संघाला 6 धावांनी पराभव पत्करावा लागला.

या रोमांचक सामन्यात एकावेळी हैदराबाद संघ सामना सहज खिशात घालणार असे वाटत असताना बेंगलोरच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून विजय मिळवला. हैदराबाद संघाने 3 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांना सामन्याच्या अंतिम टप्प्यात 24 चेंडूत 35 धावांची आवश्यकता होती. परंतु आरसीबी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा टिकाव लागला नाही.

सामन्यातील 17 व्या षटकात शहबाज अहमदला गोलंदाजी करीता आणण्याचा कर्णधार विराट कोहलीचा निर्णय कामी आला. या षटकात शाहबाजने हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांना बाद करत बेंगलोरला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. नंतर शेवटच्या षटकांत बेंगलोरने राशिद खानला धावबाद करून आपला विजय निश्चित केला.

महत्त्वाच्या बातम्या-

दोन नवे कर्णधार आज आमने सामने; ‘अशी’ असेल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सची प्लेइंग XI

दिल्लीच्या गोलंदाजीला येणार धार! ‘हा’ गोलंदाज आयपीएल २०२१ मध्ये पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज

आश्चर्यच आहे! आयपीएल इतिहासात आरसीबीने ‘एवढ्या’ वर्षानंतर केला १५० पेक्षा कमी धावांचा बचाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---