क्रिकेट चाहते इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) आतुरतेने वाट पाहत आहेत. २६ मार्चपासून आयपीएलच्या १५ व्या हंगामाचे बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला आहे. बटलर वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंडच्या कसोटी आणि टी२० संघाचा भाग नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाने जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स आणि ऑली पोपला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ताफ्यात सामील केले.
जॉस बटलर (Jos Buttler) शुक्रवारी (१८ मार्च) जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडिअममध्ये पोहोचला. या स्टेडिअममध्ये आयपीएल हंगामापूर्वी लागलेल्या राजस्थान (Rajasthan Royals) संघाच्या शिबिरात सामील झाला. राजस्थान संघात सामील होताच बटलरने आगामी आयपीएल हंगामात युझवेंद्र चहलसोबत (Yuzvendra Chahal) सलामीला फलंदाजी करण्याच्या अफवांना नाकारले.
आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ सोडत राजस्थान संघात सामील झालेला चहल बुधवारी (१६ मार्च) ताफ्यात सामील झाला. मजा-मस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या चहलने संघात सामील होताच, ट्विटरवरही मस्ती करण्यास सुरुवात केली. चहलने राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्वीट केले की, तो आगामी हंगामासाठी संघाचा नवीन कर्णधार आहे. त्याचबरोबर त्याने ही घोषणा केली होती की, आयपीएल २०२२मध्ये बटलरसोबत डावाची सुरुवात करेल. मात्र तरीही, बटलरने या गोष्टीला दुजोरा दिला नाही. त्याने चहलसोबत डावाची सुरुवात करण्याला स्पष्ट नकार दिला.
Jos bhai is here and his reaction is GOLD! 😂💗#RoyalsFamily | @josbuttler pic.twitter.com/zUsR6tTPtS
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 18, 2022
आयपीएल २०२२मधील पहिला २६ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडणार आहेत. दुसरीकडे राजस्थान संघाच्या आयपीएलमधील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर त्यांचा पहिला सामना २९ मार्च रोजी पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद येथे होणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघ
संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करियप्पा, नवदीप सैनी, ओबेद मॅककॉय, अनुय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गढवाल, जेम्स नीशम, नेथन कुल्टर-नाईल, रस्सी व्हॅन डर दसन, डॅरेल मिशेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटने कर्णधारपद सोडणे विरोधी संघासाठी धोक्याची घंटी’, असे का म्हणाला ग्लेन मॅक्सवेल? घ्या जाणून
पंड्या बंधू खेळणार वेगवेगळ्या आयपीएल संघांकडून, हार्दिकची वहिनीने शेअर केला भावूक व्हिडिओ
काय आहे एमएस धोनीच्या ‘जर्सी नंबर- ७’चे रहस्य? खुद्द ‘माही’नेच केलाय खुलासा