भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघात सध्या पाच सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता दुसर्या सामन्यात पुनरागमन करत बाजी मारली होती. त्यानंतर आज तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. भारताने या डावात २० षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या. मात्र भारताच्या या डावात एक मजेशीर घटना घडली.
जोस बटलरने चुकवला थ्रो
भारताच्या डावात १९व्या षटकात जोफ्रा आर्चर गोलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी भारताच्या ५ बाद १३२ धावा झाल्या होत्या. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पंड्या फलंदाजी करत होते. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र आर्चरच्या स्लोअर चेंडूंवर त्याला हा फटका मारता आला नाही. त्यामुळे चेंडू विकेटकीपिंग करणार्या जोस बटलरकडे गेला. यावेळी नॉन-स्ट्राईकला असलेल्या विराट कोहलीने धाव चोरण्याचा प्रयत्न केला. जोस बटलरने स्टंपवर थ्रो मारायचा प्रयत्न केला, पण त्याचा थ्रो हुकला आणि कोहली धावचीत होण्यापासून बचावला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/swannyg66/status/1371840514706771973?s=21
दरम्यान, पहिल्या डावात फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला केवळ १५६ धावाच करता आल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देताना अर्धशतक झळकावले. त्याने ४६ चेंडूत नाबाद ७७ धावांची खेळी केली. मात्र आता हाती आलेल्या शेवटच्या वृत्तानुसार इंग्लंडचा संघ हे लक्ष्य सहज गाठतो आहे. १६ षटकात इंग्लंडने २ बाद १३६ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
INDvsENG 3rd T20: जोस बटलरचे आक्रमक अर्धशतक; इंग्लंडच्या १० षटकात २ बाद ८३ धावा
व्हिडिओ : मार्क वूडने राहुलला केले क्लीन बोल्ड, खातेही न उघडता परतला तंबूत
अरेरे! सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद होताच राहुलवर ओढवली ही नामुष्की