भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी२० सामना नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लिश संघाने ८ गडी राखून आणि १८.२ षटकातच पूर्ण केले.
इंग्लंड संघाकडून आक्रमक फलंदाज जोस बटलरने या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने ५२ चेंडूत नाबाद ८३ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या रणनिती बद्दल स्पष्टीकरण दिले.
“पॉवरप्ले मध्ये अवलंबला सावध पवित्रा”
इंग्लिश गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत भारतीय संघाला १५६ धावांवर रोखले होते. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि ८३ धावांची नाबाद खेळी करत इंग्लंड संघाला सामना जिंकवून दिला. सामन्यानंतर बटलर म्हणाला, “लोकांनी माझ्याकडून अपेक्षा करणेच सोडून दिले आहे की मी फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावा करू शकतो की नाही. परंतु आज आम्ही पॉवरप्ले मध्ये सांभाळून खेळलो. त्यानंतर आम्ही शॉट खेळायला सुरुवात केली. आज बरे वाटले ज्याप्रकारे मी माझ्या हातांचा वापर केला. याचा मला खूप फायदा झाला.”
रणनितीबाबत केला खुलासा
बटलरला फिरकी गोलंदाजांना खेळणे कठीण जाते. परंतु या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजांना देखील चांगले खेळून काढले. तो म्हणाला, “मुख्यतः युवजेंद्र चहलला आम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये खूप सांभाळून खेळलो. त्याचे ५-६ चेंडू खेळून झाल्यानंतर मी त्याला षटकार मारला. त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. आधी त्याच्या गोलंदाजीचा अंदाज घ्यायचा, ही आमची रणनिती होती.”
मॉर्गनचे केले कौतुक
“ही एक अशी उपलब्धता आहे, जी प्रत्येकजण आपल्या नावावर करू पाहत आहे. ईओन मॉर्गन हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महारथी आहे. त्याने इंग्लंडला या प्रकारात त्या स्थानी नेऊन ठेवले आहे, ज्या स्थानी यापूर्वी इंग्लंड संघ नव्हता”, अशा शब्दात बटलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० टी२० सामने खेळण्याचा कारनामा करणाऱ्या इंग्लंडच्या कर्णधार ईओन मॉर्गनचे कौतुक केले.
महत्वाच्या बातम्या:
वेस्ट इंडिज लिजेंड्सची इंग्लंडवर मात, आता सेमिफायनलमध्ये होणार भारताशी मुकाबला
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये मिळू शकते सामना पाहण्याची संधी
सूर्यकुमार यादवला वगळण्याच्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला, संधी न देताच