भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या ३ फलंदाजांना शून्यावर बाद केले. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघ इंग्लंडला ११० धावांवरच रोखण्यात यशस्वी ठरला आणि भारतीय संघाने १० विकेट्सने हा सामनाही जिंकला. यानंतर आता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने बुमराहबद्दल पत्रकार परिषदेत अशी काही प्रतिक्रिया दिली आहे, जिची चर्चा होत आहे.
बुमराहने इंग्लंडच्या तब्बल ६ फलंदाजांना बाद केले. ७.२ षटके फेकताना त्याने केवळ १९ धावा देत या विकेट्स घेतल्या. सर्वप्रथम त्याने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला शून्यावर बाद केले. त्यानंतर जो रूटलाही शून्यावर तंबूत धाडले. मग जॉनी बेयरस्टो (०७ धावा) आणि लियाम लिविंगस्टोन (० धावा) यांनाही त्याने आपले शिकार बनवले. डेविड विली आणि ब्रेडन कर्स यांनाही त्याने आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात फसवले.
या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला पत्रकार परिषदेत बुमराहविषयी प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने त्याला विचारले की, बुमराह वर्तमानकाळातील जगातील नंबर एक फलंदाज आहे का, तुला काय वाटते?. या प्रश्नाचे उत्तर देताना बटलर म्हणाला की, “यात कोणीतीही शंका नाही की, तो जगातील नंबर एक गोलंदाजांपैकी एक आहे. मला तर असे वाटते की, त्याची ताकद आणि त्याची क्षमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.”
“भारतीय संघाविरुद्ध क्रिकेट खेळणे खरोखरच आव्हानात्मक आहे. तुम्हाला या शानदार फलंदाज आणि गोलंदाजांचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही सर्वश्रेष्ठ खेळाडूंविरुद्ध स्वतला आव्हान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता. यात कोणतीही शंका नाही की, तो सर्वश्रेष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. आम्ही पुढील सामन्यातील आव्हानाच्या प्रतिक्षेत आहोत. आम्ही या सामन्यात आणखी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू,” असे बटलरने पुढे म्हटले.
दरम्यान बुमराहने इंग्लंडविरुद्ध केलेले गोलंदाजी प्रदर्शन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन ठरले आहे. अशात आता तो पुढील सामन्यात कसे प्रदर्शन करतो, यावर सर्वांची नजर असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दणकेबाज विजयानंतरही टीम इंडियावर ‘नाराज’ आहेत आनंद महिंद्रा; म्हणाले, ‘टीव्ही सुरू करण्याआधीच…’
विराटची पाठराखण करत माजी खेळाडूने साधला टिकाकरांवर नेम म्हटला, ‘त्याला थेट ड्रॉप…’
‘मैदानातही आणि मैदानाबाहेरही डक’! बुमराहची पत्नी संजनाने इंग्लिश फलंदाजांना केले ट्रोल