---Advertisement---

मंकडींग आऊट झालेल्या बटलरकडूनच अश्विनचं राजस्थानमध्ये स्वागत, म्हणाला, ‘काळजी नको, मी क्रिजमध्येच

On: रविवार, फेब्रुवारी 13, 2022 12:17 PM
r ashwin jos buttler
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ (IPL 2022) हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी खेळाडूंचा लिलाव (IPL Auction) झाला. बंगळुरूला झालेल्या या लिलावाचा पहिला दिवस अनेक युवा खेळाडूंनी गाजवला. जवळपास १५ खेळाडूंना ८ कोटींहून अधिकची बोली लागली. दरम्यान, भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याला देखील चांगली रक्कम मिळाली. त्याला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) खरेदी केले आहे. 

अश्विनची मुळ किंमत २ कोटी होती. पण त्याला १५ व्या आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने ५ कोटी रुपये मोजले. त्यामुळे आता अश्विन आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान संघाकडून खेळताना दिसणार आहे. अशात त्याच्या आणि जॉस बटलरच्या संबंधांबद्दलही चर्चा होत आहे.

यामागे कारण म्हणजे २०१९ आयपीएल हंगामावेळी पंजाब किंग्सकडून खेळताना आर अश्विनने राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलर याला (Jos Buttler) मंकडींग पद्धतीने केले होते. त्यानंतर या घटनेची बरीच चर्चा देखील झाली. तसेच अनेकांनी अश्विनचे समर्थन केले होते, तर अनेकांनी अश्विनवर टीका केली होती. त्यामुळे या घटनेनंतर अश्विन आणि बटलरमध्येही वाद झाल्याचे आणि त्यांचे संबंध बिघडल्याचे दिसले होते.

पण, आता अश्विनला राजस्थान संघाने आयपीएल २०२२ साठी खरेदी केले आहे, तर बटलरला त्यांना लिलावापूर्वीच संघात कायम केले होते. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२२ हंगामात एकत्र खेळताना दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

अशातर स्वत: जॉस बटलरने अश्विनचे राजस्थानमध्ये स्वागत केले आहे. त्याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बटलरने अश्विनचे स्वागत करताना म्हटले आहे की, ‘हॅलो ऍश, काळजी करू नकोस, मी क्रिजच्या आतच आहे. रॉयल्स संघासाठी गुलाबी जर्सीत तुला खेळताना पाहाण्याची वाट पाहात आहे. तुझ्याबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.’

याशिवाय भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागनेही अश्विन आणि बटलर यांच्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. त्याने म्हटले होते की अश्विनला आता बटलरबरोबर मिळून मंकडिंगचा प्लॅन करताना पाहाण्यात आनंद होईल.

राजस्थान रॉयल्सने या लिलावात पहिल्या दिवशी अश्विन व्यतिरिक्त ट्रेंट बोल्टवर ८ कोटींची, शिमरॉन हेटमायरवर ८.५ कोटींची, युजवेंद्र चहलवर ६.५ कोटींची बोली लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘बेबी एबी’वर चॅम्पियन संघाने लावली बोली , डिविलियर्ससह ट्विटरवर आल्या अशा प्रतिक्रिया

आयपीएल ऑक्शन दोन परिवारांसाठी ठरला खास!! एकाच दिवशी केली तब्बल ४२.५ कोटींची कमाई

IPL Auction: पंजाबकडे सर्वाधिक तर लखनऊकडे सर्वात कमी रक्कम, पाहा दुसऱ्या दिवसासाठी सर्व संघांची शिल्लक रक्कम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---